वटवृक्ष मंदीर समितीची पारंपारिक कार्यपध्दती लक्षवेधक – डॉ.शैलेंद्र देवळाणकर
(श्रीशैल गवंडी, अ.कोट दि.२९/०३/२६) – गेल्या अनेक वर्षांपासून स्वामींच्या दर्शनाकरिता स्वामीभक्त या नात्याने मी अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरात येत असतो. येथील दर्शन व्यवस्था अत्यंत उत्तम आहे. आजच्या व्यवहारीक जगात सर्व भाविकांना मोफत स्वामी दर्शनाची सोय ही मंदिर समितीची जमेची बाजू आहे. मंदीर समितीच्या या व अशा अनेक कार्यातून स्वामी नामाचा प्रचार आता जगभर विस्तारित होत आहे. स्वामींच्या या विस्तारित नाम प्रचारामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची पारंपारिक कार्यपद्धती ही लक्षवेधक ठरत असल्याचे प्रतिपादन भारताचे आंतरराष्ट्रीय विश्लेशक तथा उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन
श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी
डॉ.शैलेंद्र देवळाणकर व त्यांचे सुविद्य पत्नी यांचा श्री. स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी डॉ.शैलेंद्र देवळाणकर बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, महेश साठे,
अमर पाटील उपस्थित होते.
फोटो ओळ – डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांचा सपत्निक सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!