गावगाथा

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये टीचर एम्पावरमेंट प्रोग्राम’ व जिल्हास्तरीय आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.

चेअरमन महेश इंगळे यांना जिल्हा इंग्रजी असो. व यशकल्याणी संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान.

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये टीचर एम्पावरमेंट प्रोग्राम’ व जिल्हास्तरीय आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.
चेअरमन महेश इंगळे यांना जिल्हा इंग्रजी असो. व यशकल्याणी संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२९/०३/२६)
शिक्षकांनी तणावमुक्त राहून विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा देणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रोलक्स वेलनेसच्या संस्थापिका डॉ.प्रचीती पुंडे यांनी केले. नुकतेच टीचर एम्पावरमेंट प्रोग्राम तसेच जिल्हास्तरीय आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. यावेळी डॉ.प्रचीती पुंडे बोलत होत्या. इंग्रजी कार्यशाळा व पुरस्कार सोहळ्यात शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘विविध शैक्षणिक उपक्रम, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि सन्मान सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. या कार्यशाळेत डॉ.प्रचिती पुंडे यांनी आधुनिक जीवनशैली व शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर अत्यंत प्रभावी आणि इंटरॲक्टिव सत्र घेतले. या प्रसंगी ग्लोबल अकॅडमिकचे प्रा.डॉ.झेड.एन.पाटील यांनी इंग्रजी अध्यापनात भाषा कौशल्य विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन करत शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धतींचे महत्त्व पटवून दिले. या वेळी चेअरमन महेश इंगळे यांना जिल्हा इंग्रजी असो. व यशकल्याणी संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल सेवासदन हायस्कूल, सोलापूरच्या डॉ.अंजली धनराज शिरसी-अलेगावी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक यशाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमात जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना ‘जिल्हास्तरीय आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रा.सुहास रामकृष्ण गलांडे (करमाळा), प्रा.उषा गोविंदराव देशमुख (माळशिरस), प्रा.रवींद्र कानिफनाथ बारस्कर (माढा), प्रा.उत्तरेश्वर बळीराम भोसले (पंढरपूर), प्रा.आनंदा सोमन्ना क्षीरसागर (सांगोला), प्रा.सुरेश देवेन्द्रप्पा पिरगोंडे (अक्कलकोट), प्रा.मलिक चाँद मुजावर (दक्षिण सोलापूर), प्रा.रामकृष्ण दत्तू इंगळे (बार्शी), प्रा.प्रमोद मुरलीधर जलगीरे (मंगळवेढा), प्रा.तंबाके विश्वनाथ अण्णाराव (उत्तर सोलापूर), प्रा.परमेश्वर जालिंदर क्षीरसागर (मोहोळ) व प्रा. धनश्री दिलीपराव विधाते (जुळे सोलापूर) यांचा समावेश होता. तसेच यशकल्याणी संस्थेच्या वतीने करमाळा येथील नवभारत आदर्श शाळेला एक्कावन हजार रुपयांचे बक्षीस देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त मा.संपतराव (भारतराव) शिंदे पाटील होते. व्यासपीठावर प्रा.डॉ.गणेश करे पाटील, डॉ.प्रचीती पुंडे, प्रा.डॉ.झेड.एन.पाटील, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे,
प्रा.बाळकृष्ण लावंड, श्रीशैल गवंडी, सुनीता देवी, गुरुनाथ मुचंडे, अश्पाक काझी, करमाळा तालुका अध्यक्ष कल्याणराव साळुंके, जिल्हा सचिव धनाजी राऊत, आबासाहेब दाढे, शशिकांत चंदनशिवे, अगतराव भोसले, सुखदेव गिलबिले, बापू गायकवाड, आबासाहेब कारंडे, गणेश गायकवाड, शंकर दिरगुळे, निवृत्ती बांडे तसेच विविध तालुक्यांतील इंग्रजी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, प्रा.नागनाथ जेऊरे, विजय पवार सर, सचिन घाटगे सर, उमेश सोनवणे, रविंद्र नष्टे, बंटी नारायणकर, विपूल कडबगांवकर, वैजनाथ खिलारी, चित्तरंजन आगरथडे आदींसह मंदिर सेवेकरी यांचेसह सर्व इंग्रजी शिक्षकांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळ _ चेअरमन महेश इंगळे यांना
जिल्हा इंग्रजी असो. व यशकल्याणी संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देताना व जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करताना छायाचित्रात दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button