गावगाथा

स्विमिंग ग्रुपच्या वतीने बसस्थानक लगत पाणपोईची सुविधा.स्विमिंग ग्रुपचे संस्थापक व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते पाणपोईचा शुभारंभ.

सामाजिक बांधिलकी

स्विमिंग ग्रुपच्या वतीने बसस्थानक लगत पाणपोईची सुविधा.स्विमिंग ग्रुपचे संस्थापक व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते पाणपोईचा शुभारंभ.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०३/०४/२६)
उन्हाळ्याची तिव्रता लक्षात घेऊन येथील स्विमींग ग्रुपच्या वतीने सोलापूर रोडवरील बसस्थानक लगत स्विमिंग ग्रुपच्या वतीने बसस्थानक लगत पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ग्रुपचे सदस्य शेखर आडवितोटे यांनी दिली. स्विमिंग ग्रुपचे संस्थापक तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते या पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला

. यावेळी बोलताना नगरसेवक महेश इंगळे यांनी भर उन्हाळ्यात बसस्थानक लगत पाणपोईची सुविधा उपलब्ध दिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना याचा नक्कीच लाभ होईल. आणि हे पुण्यकार्य करण्याची जबाबदारी ग्रुपचे सदस्य शेखर अडवितोटे यांनी उचलली आहे. त्यांच्या सेवेत आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, प्रसन्न हत्ते, सिद्धाराम बिडवे, शेखर आडवितोटे, अमोल माने, रमेश शिंदे, प्रशांत कर्की, अंकूश केत, सुनिल पवार, चंद्रकांत गवंडी, स्वामीनाथ मुसळे, श्रीकांत झिपरे, समर्थ स्वामी इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – पाणपोईचा शुभारंभ करताना नगरसेवक महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button