दि.३ एप्रिल रोजी श्री.वटवृक्ष मंदिरात धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन.
१४८ व्या श्री.स्वामी पुण्यतिथी निमीत्त होणाऱ्या प्रक्षावळ पुजन व धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजनमुळे दि. ३ एप्रिल रोजी अभिषेक बंद राहतील.
प्रक्षावळ पुजनच्या काळात सकाळी
८ ते ११ या वेळेत भाविकांनी गाभारा मंडपाच्या बाहेरून वटवृक्षाखालून श्री स्वामींचे दर्शन घेऊन भाविकांनी सहकार्य करावे – चेअरमन महेश इंगळे
(श्रीशैल गवंडी, दि.०२/०४/२६.अ.कोट)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थांचा १४८ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक ३ एप्रिल ते दिनांक
ते १५ एप्रिल २०२६ अखेर होत आहे. त्यानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात दि.३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होईल. यानिमीत्ताने उद्या शुक्रवार दि.३ एप्रिल रोजी १४८ व्या श्री.स्वामी पुण्यतिथी निमीत्त होणाऱ्या प्रक्षावळ पुजन व धर्मसंकीर्तन व्यासपीठ पूजनमुळे दि. ३ एप्रिल रोजी अभिषेक बंद राहतील. प्रक्षावळ पुजनच्या काळात सकाळी ८ ते ११ या वेळेत भाविकांनी गाभारा मंडपाच्या बाहेरून वटवृक्षा खालून श्री स्वामींचे दर्शन घेऊन भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे व पुरोहित मंदार महाराज पुजारी यांनी भाविकांना केले आहे.
या प्रसंगी बोलताना चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे यंदाचे हे १४८ वे वर्ष आहे. महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथी पासून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीने धर्मसंकीर्तन कार्यक्रमांची सुरुवात केली. तेंव्हा पासून आजही सालाबादप्रमाणे नियमितपणे देवस्थानने ही परंपरा जपली आहे.
या धर्मसंकीर्तन महोत्सव सोहळ्यात विविध नामांकित मान्यवरांचे प्रवचन, कीर्तन, भक्तीसंगीत, कथ्थक इत्यादी कार्यक्रम होणार आहेत, तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा व स्वामी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, शिवशरण अचलेर, अमर पाटील, संजय पाठक, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, नागनाथ गुंजले, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, इत्यादी उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!