नाशिकच्या गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिकांच्या भक्तीसंगीत गायनाने फुलले धर्मसंकीर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प.
नाशिकच्या गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिकांच्या गायन सेवेने श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमीत्त आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवास प्रारंभ.

(श्रीशैल गवंडी, दि.०३/०४/२६.अकोट)
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतीथी निमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने सालाबादा प्रमाणे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवास आज मोठ्या भक्तीभावाने सुरूवात करण्यात आली. या
धर्मसंकीर्तन महोत्सवातील पहिले पुष्प आज नाशिकच्या गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिकांच्या भक्तीसंगीत गायनाने फुलले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी गायिका मीरा कुलकर्णी व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला.
पुढे या भक्ती संगीत गायन सेवेत
गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिका अर्चना कुलकर्णी, वीणा देशपांडे यांनी एकल व समिश्र गायन सेवेतून भक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, शंभू शिवशंकर, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, निघालो घेऊनी दत्ताची पालखी, तारकमंत्र आदीसह अनेक भावगीते गाऊन श्री चरणी सेवा समर्पित केली. या गायन सेवेत त्यांना तबल्यावर जगदीश सोनवणे, हार्मोनियमवर ओंकार पाठक, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथ संगत केली.
यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, बाळासाहेब सरदेशमुख, राजाभाऊ सरदेशमुख, श्रीशैल गवंडी,
मल्लिनाथ बोधले, प्रा.शिवशरण अचलेर, राजू भोसले सर, रमेश शिंदे सर, अमर पाटील, बाळासाहेब एकबोटे, संतोष पराणे, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार, नरसिंग क्षीरसागर, सागर गोंडाळ, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात भक्ती संगीत गायनसेवा सादर करताना गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिका अर्चना कुलकर्णी, वीणा देशपांडे व सहकारी दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!