गावगाथा

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट

अक्कलकोट : (प्रतिनिधी)श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने स्वामी भक्तांसाठी उत्कृष्ट व्यवस्थापन केले जात असल्याचे मनोगत सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी व्यक्त केले.
संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासामार्फत स्वामी भक्तांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे भेट दिल्यानंतर न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या उपस्थितीत सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ तसेच जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची कोरीव व सुबक प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी अन्नछत्राच्या स्वयंपाक गृहाची पाहणी करून तेथील कार्यपद्धती व व्यवस्थापनाची माहिती घेतली.
या प्रसंगी तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकरराव कवीतके, अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भीतावडे, मंडल अधिकारी जुबेर नदाफ, तलाठी एस. डोईफोडे यांच्यासह न्यासाचे विश्वस्त भाऊ कापसे उपस्थित होते.
तसेच न्यासाचे गोटू माने, एस. के. स्वामी, बालाजी कटारे, स्वामीनाथ बाबर, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, गोविंदराव शिंदे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button