गावगाथा

मा. सिद्धारामजी म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

वाढदिवस विशेष

मा. सिद्धारामजी म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
अक्कलकोट : प्रतिनिधी –मा. सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट शहरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी दुधनी येथील आझम शेखजी व मुबारक कोरबु यांच्या वतीने न. प. उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १, अक्कलकोट येथे विद्यार्थ्यांना वही, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात सलगर जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे यांच्या शुभहस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविक व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
याशिवाय ग्रामीण रुग्णालयातील गरजू व निवासी रुग्णांना दुधनी नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले. तसेच अक्कलकोट शहरातील झोपडपट्टी परिसरात दुधनी येथील सामाजिक कार्यकर्ते आझम शेखजी यांच्या हस्ते फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसिन मोकाशी यांनी केले. यावेळी आझम शेखजी, मुबारक कोरबु, मोहसिन मोकाशी, योगेश पवार, सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास, ज्योतिबा पारखे, सैपन शेख, आकाश शिंदे, हमीद गिलकी, काशिनाथ लोडेनवरु, मैनुद्दीन कोरबु, शिवशरण ईचगे, सुनिल ईसापुरे, रमेश चव्हाण, असद फरास, इम्रान पठाण, इरफान शेख, शकिल शेख, नुर कोरबु, विकी कोरे, शबाब मुजावर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
या विविध सामाजिक उपक्रमांमुळे मा. सिद्धारामजी म्हेत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य घडून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button