राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कारासाठी प्रा. अँड. सदाशिव माळगे यांची निवड
पुणे : शिक्षण व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. अँड. सदाशिव माळगे यांची राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिक्षण व समाजसेवा क्षेत्रात प्रा. माळगे यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत पुणे येथील निवारा वृद्धाश्रम हॉल, एस. एम. जोशी फाउंडेशन समोर, पत्रकार भवन शेजारी, गंजवे चौक, नवी पेठ येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. सदाशिव माळगे यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
प्रा. माळगे हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्येही ते सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडले असून सामाजिक जाणीव जपणाऱ्या त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!