सचिन बंगरगी यांचा डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या हस्ते सत्कार
पुणे – वागदरी (ता. अक्कलकोट) येथील सुपुत्र व सध्या HDFC बँकेमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले सचिन बंगरगी यांच्या बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट व प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात शिवा संघटना, पुणे व अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, पुणे यांच्या वतीने पोलीस उपआयुक्त (DCP) डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या शुभहस्ते सचिन बंगरगी यांचा सन्मान करण्यात आला.
बँकिंग क्षेत्रात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने काम करत समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या सचिन बंगरगी यांच्या कार्याची दखल घेऊन करण्यात आलेला हा सन्मान खरोखरच अभिमानास्पद मानला जात आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला मिळालेली ही पोचपावती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
दरम्यान, हा गौरव सोहळा समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. तसेच सचिन बंगरगी यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या धोंडप्पा नंदे यांचेही यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
आपल्या कष्ट, प्रामाणिकता आणि समाजाभिमुख कार्यामुळे सचिन बंगरगी यांचा झालेला हा सन्मान वागदरी गावासाठीही अभिमानाची बाब ठरत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!