पुण्यात महात्मा बसवेश्वरांची ८९५ वी जयंती उत्साहात साजरी

HTML img Tag
पुणे — साडेतीन मुहूर्तांपैकी पवित्र अक्षय तृतीया निमित्त लिंगायत धर्मियांचे आराध्य दैवत, विश्वगुरू जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९५ वी जयंती महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, पुणे शहर समितीच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम पुणे येथील महाराणा प्रताप बाग येथे पार पडला.

जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशूराम वाडेकर, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, माजी आमदार रवींद्र धंगेकर, प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित,पीएमपीएल चे अध्यक्ष अजय खेडेकर , माजी नगरसेवक संजय बालगुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
महात्मा बसवेश्वरांनी “सर्व मानव समान आहेत” हा ठाम संदेश समाजाला दिला. त्यांनी जन्मावर आधारित उच्च-नीच भेद नाकारून “कायकवे कैलास” (प्रामाणिक श्रम हीच पूजा) ही संकल्पना मांडली. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसून प्रत्येकाने प्रामाणिकपणे श्रम करून स्वाभिमानाने जगावे, हा त्यांचा मूलभूत विचार होता.

जातीभेद आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी ‘अनुभव मंटप’ स्थापन करून सर्व जाती-धर्मातील लोकांना समान व्यासपीठ उपलब्ध करून दिले. बाराव्या शतकात स्थापन झालेले ‘अनुभव मंटप’ हेच खऱ्या अर्थाने जागतिक लोकशाहीचे पहिले मंदिर मानले जाते. त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत सामाजिक बंधने मोडण्याचा प्रयत्न केला. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
यावेळी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेश समितीचे सरचिटणीस बाळासाहेब होनराव, कोषाध्यक्ष सुरेंद्र शेठ गाढवे, पंढरीनाथ लांडगे, रवींद्र होडगे, माणिक कस्तुरे, विलास हापसे, प्रकाश गुळवे, सुधाकर हलगणे तसेच पुणे शहर समितीचे अध्यक्ष सोमेश्वर वाडी यांच्यासह शिवानंद पाटील, अनिल भत्ते, राजू मिटकरी, रविकिरण पाटील, दत्तात्रय लांडगे, संदीप हलगणे, धोंडप्पा नंदे, गणेश हिंगमिरे, रोहन जठार, शुभम गाढवे, सिद्राम स्वामी, सिद्धू गोगी, हरिचंद्र केंदळे, दीपक नवाळे, संतोष केंजळे, शिवलिंग होनराव, बसवराज हंदराळे, संग्राम मलेश, किशोर वारीकर, संतोष गुळमिरे, उत्कर्ष लांडगे, इराण्णा पडशेट्टी, अविनाश उरवणे, तुषार पुस्तके, उमेश संगमनेरकर, सागर मांडे, ओंकार शेटे, अनिल स्वामी आदी उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!