करजगीच्या सुपुत्रांची शिक्षणासाठी उदार भेट : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉम्प्युटर संच प्रदान

HTML img Tag
करजगी (ता. अक्कलकोट) — शिक्षण हीच खरी प्रगतीची वाट आहे, या भावनेतून गावच्या सुपुत्रांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व कन्नड मुलांची-मुलींची शाळा अधिक आधुनिक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी गावचे सुपुत्र पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी आणि ग्रामपंचायत सदस्य रवी लिंबोळे यांनी शाळेस कॉम्प्युटर संच भेट दिला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही डिजिटल शिक्षणाची संधी मिळावी, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळून त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या उदात्त हेतूने ही भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची नवी दारे खुली झाली असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून आला.
यावेळी शाळेचे शिक्षक, करजगीचे सरपंच विवेकानंद उबरजे, अॅड. दयानंद उबरजे तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या दोन्ही मान्यवरांचे कौतुक करत, त्यांच्या सामाजिक जाणीवेचे व शिक्षणाबद्दलच्या प्रेमाचे मनापासून स्वागत केले.
गावाच्या मातीशी असलेले नाते जपत आपल्या कर्तृत्वातून समाजाला काहीतरी परत देण्याची भावना जपणारे महेश बोळकोटगी आणि रवी लिंबोळे यांचे हे कार्य करजगीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या वाटचालीला नवे पंख लाभले आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!