अप्पर संगनबसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीने जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

HTML img Tag
HTML img Tag
महात्मा बसवेश्वर महाराज की जय…. या जयघोषाने अप्पर डेपो दणाणून गेला.

आरोग्य शिबिर,लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप,
अमोल धडके /पुणे प्रतिनिधी महामानव,विश्र्वगुरू,परिवर्तनवादी,सत्वपुरूष,लिंगायत धर्म संस्थापक,सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक,थोर समाजसुधारक,वर्गविरहित समाज निर्माता जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९५ वी जयंती अक्षय-तृतीया दि. १९ एप्रिल २०२६ रोजी बिबवेवाडी अप्पर डेपो येथे श्री संगनबसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाने मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. बाजीराव रोड येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला संगनबसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी ज्योत प्रज्वलित करून ती ज्योत पायवाट मार्गे अप्पर डेपो येथे इच्छित कार्यक्रम स्थळी आणून पूजन करण्यात आले.यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज की जय.. या जयघोषाने अप्पर डेपो दणाणून गेला.

या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपचे नगरसेवक पिंटू भाऊ धाडवे,नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,नगरसेविका रुपालीताई दिनेश धाडवे,नगरसेविका वर्षाताई साठे, भाजपा अनु :जाती मोर्चा शहर अध्यक्ष भीमराव साठे,नगरसेवक प्रतिक प्रकाश शेठ कदम ,नेहा प्रतिक कदम,शिवसेना नेते गणेश मोहिते,शिव संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शैलेश जकापुरे,युवा उद्योजक दीपक शेठ ओसवाल,युवा उद्योजक अमोल भाऊ परदेशी,युवा उद्योजक अमोल भाऊ कांटे, युवा उद्योजक संजय पाटील,सामाजिक कार्यकर्ते मनोज देशपांडे,अखिल भारतीय मराठा पुणे शहर उपाध्यक्ष -भाजपा पर्वती सरचिटणीस ज्ञानेश्वर माऊली मानकर,श्री गणेश मित्र मंडळ अध्यक्ष प्रीतम शेठ नागपुरे,सागर शेठ सोळंके,शिवशंभो टायर्स मा. यार्ड गणेश घाटे, गनिमी कावा युवा सेवा संघ संजय वाघमारे,युवा उद्योजक मधुकर सुरवसे, मनसे पुणे शहर अध्यक्ष महेश भाऊ भोईबार,दिपक पवन ,शुभम मोरे ,विनायक पाडेकर विशेष अनेक बहुसंख्य या सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली

.यावेळी प्रमुख उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग व त्यांची शिकवण याविषयी सर्व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.तसेच अप्पर डेपो संगनबसवेश्वर तरुण मंडळाचे फलकाचे अनावरण नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा देखील मोठ्या संख्येने महिलांच्या उपस्थित पारंपारिक पद्धतीने महिलांनी पाळण्याची पूजा करून जन्माचा पाळणा सोहळा,गीत गाऊन व महात्मा बसवेश्र्वरांचा गजर केला.यावर्षी विशेष आकर्षण मंडळाने सर्व उपस्थित महिलांना भगवा फेटा बांधून महिलांना विशेष मान देण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने अप्पर डेपो येथील बसवेश्वर भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंतीचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ नरेंद्र देशमुख व त्यांच्या टीमच्या सल्ल्याने उपस्थित नागरिकांनी व शिवभक्तांनी ,कार्यकर्त्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी लहान मुलांचे डान्स स्पर्धेचे आयोजन व लहान मुलांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. लहान मुलांनी डान्स स्पर्धेत भाग घेऊन या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळी कटपुटली कार्यक्रम ७ ते ९ वेळेत,लहान मुलांना खाऊवाटप आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये संगनबसवेश्वर तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक धोनी वर्दाळे, अध्यक्ष खंडू माने ,उपाध्यक्ष शिवशरण रामचंद्र चिकमळ , सचिव शांतमल काळे,संग्राम आळदे,सुनील चिकमळ,बसवराज माळी,अभय माळी,बसवराज आलदे,संतोष माळी,रामेश्वर बिराजदार, सायबण्णा म्हेत्रे, शरणप्पा आलदे,बसवराज चौघुले, श्रीशैल निंगदळी,पुंडलिक बिराजदार,शंकर चिकमळ, संजय अगरखेड,
,खजिनदार रेवणप्पा चिकमळ,रवी आलदे,जगदीश येणगुरे,प्रकाश थंब,स्वागतोत्सुक इराण्णा मंठाळे,कार्याध्यक्ष मल्लिनाथ फुलारी,श्रीशैल .ल. चिकमळ, सिद्धाराम माळी,लक्ष्मण गोगाव,स्वप्निल भीमपुरे,महादेव बरंबे,परमेश्वर सावंत माजी उपाध्यक्ष,शंभू मंगले माजी खजिनदार, श्रीशैल चिकमळ (पाणी व्यवस्थापक), हनुमंत बडदाळे, पिरप्पा खैराटकर,व पत्रकार अमोल धडके पत्रकार धोंडप्पा नंदे,महादेव पोमाजी ,तसेच संगनबसवेश्वर तरुण मंडळाचे सर्व संघटक,कार्याध्यक्ष,आधारस्तंभ कार्यकर्ते, छोटे कार्यकर्ते,महिला मंडळ,स्वागतोत्सुक,संगनबसवेश्वर तरुण मंडळाचे सर्व सभासद अप्परचे स्थानिक नागरिक, यासोबत इतर अनेक सामाजिक मंडळाचे कार्यकर्ते देखील आवर्जून
मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाचे उत्तमरीत्या सूत्रसंचालन बसवराज म्हेत्रे यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!