गावगाथा

गावगाथा चे संपादक – पत्रकार तथा लेखक धोंडप्पा नंदे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे : साहित्य, लेखन आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ आयोजित भव्य सोहळ्यात पत्रकार, संपादक व साहित्यिक धोंडप्पा नंदे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

धोंडप्पा नंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून लेखन व पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी ‘गावगाथा’ दिवाळी अंकाचे ५ वर्षांपासून सातत्याने प्रकाशन केले आहे. विविध दैनिकांमधून सातत्यपूर्ण लेखन करत त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी अनेक वर्षे सायकल चालवत जनजागृती करण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुण्यातील निवारा वृद्धाश्रम येथे ‘राष्ट्रभक्ती सन्मान सोहळा’ व ‘शौर्य करिअर अकॅडमी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सायबर गुन्हे साक्षरता व जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोपाल खंडारे (चेअरमन, स्वराज कॉलेज ग्रुप) उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. महेश थोरवे (संचालक, माईर्स एम. आय. टी. इन्स्टिट्यूट, पुणे) होते. यावेळी राजेंद्र कपोते (संस्थापक अध्यक्ष, पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य), डॉ. रमेश भराटे (चेअरमन, इंडियन मेडिकल असोसिएशन, दिल्ली), अजित पाटील (युवक प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र), भारती रमेश तुपे (प्रदेश अध्यक्षा, राष्ट्रभक्ती महिला संघटना) यांच्यासह हरिदास भिसे व सुनिल गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button