गावगाथा

प्रा. ॲड. सदाशिव माळगे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ आयोजित भव्य सोहळ्यात पुण्यातील प्रा. ॲड. सदाशिव माळगे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मार्गदर्शन व शैक्षणिक खर्चाची मदत करण्याचे मोलाचे कार्य माळगे सर सातत्याने करत असून त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुण्यातील निवारा वृद्धाश्रम येथे ‘राष्ट्रभक्ती सन्मान सोहळा’ व ‘शौर्य करिअर अकॅडमी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सायबर गुन्हे साक्षरता व जनजागृती अभियानाचा शुभारंभही करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. गोपाल खंडारे (चेअरमन, स्वराज कॉलेज ग्रुप) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. महेश थोरवे (संचालक, माईर्स एम. आय. टी. इन्स्टिट्यूट, पुणे) होते. यावेळी मा. राजेंद्र कपोते (संस्थापक अध्यक्ष, पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य), डॉ. रमेश भराटे (चेअरमन, इंडियन मेडिकल असोसिएशन, दिल्ली), मा. अजित पाटील (युवक प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र), भारती रमेश तुपे (प्रदेश अध्यक्षा, राष्ट्रभक्ती महिला संघटना) यांच्यासह मा. हरिदास भिसे व मा. सुनिल गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

HTML img Tag Simply Easy Learning    

हा सोहळा राष्ट्रभक्ती परिवाराच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन शेखर जगन्नाथ तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शौर्य करिअर अकॅडमी, राष्ट्रबांधव अकॅडमी, वॉरियर्स किंग कराटे डो अँड सोशल सर्विस असोसिएशन, राष्ट्रभक्ती परिवार आणि प्रहार युथ ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रा. सदाशिव माळगे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती असून शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button