श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास प्रेरणा देणारे – जयश्री देशपांडे
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते झालेल्या सत्काराप्रित्यर्थ जयश्री देशपांडे यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२७/०४/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास प्रेरणा देणारे असल्याचे मनोगत पुणे येथील पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच सहकुटूंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी जयश्री देशपांडे व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कॄपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्याकडून देवस्थानच्या कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालय व श्री स्वामी समर्थ शिशू विकास मंदीर येथील देवस्थानचे शैक्षणिक उपक्रम व धोरणांबद्दल जाणून घेतल्यानंतर जयश्री देशपांडे बोलत होत्या. पुढे बोलताना जयश्री देशपांडे यांनी देवस्थानच्या वतीने राबविले जाणारे वरील उपक्रमांसहीत देवस्थान सेवेकऱ्यांच्या पाल्यांना देवस्थानकडून देण्यात येणारे प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य व तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मदत ही स्वामी कृपेची मदत आहे. मंदीर समितीच्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत देवस्थानचा मोलाचा वाटा आहे. यामुळे ही विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करून समितीला आपण केंव्हाही स्वामी सेवा समजून मोफत मार्गदर्शन करु अशी ग्वाही दिली व आज येथे झालेल्या सन्मानाबद्दल मंदीर समितीचे विशेष आभार मानले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी,
रमेश शिंदे सर, प्रा.शिवशरण अचलेर, सुनिल पवार, बाळासाहेब एकबोटे, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, प्रशांत गुरव, अमर पाटील आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!