गावगाथा

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन 

अभियान

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन 

अक्कलकोट : (प्रतिनिधी ) 

ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे विविध आजारांबाबत जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर डॉ. वर्षा डोईफोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला.

या शिबिरामध्ये एनपीपीसी , एनटीसीपी , स्टेमी , मानसिक आजार, कर्करोग, मधुमेह , उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका यांसारख्या विविध आजारांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आजारांची लक्षणे, प्रतिबंध, योग्य उपचार पद्धती व काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ रवींद्र बनसोडे यांनी मार्गदर्शन केले .

 डॉ. जोशी यांनी उपस्थितांना विविध आजारांची लक्षणे ओळखणे व वेळेत उपचार घेण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक एन. वाय. दलाल यांनी क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती देताना लक्षणे, निदान व उपचार यांचे मार्गदर्शन केले. त्यांनी क्षयरुग्णांना शासनाकडून दरमहा 1000 आहार भत्ता दिला जात असल्याची माहितीही दिली.

या मार्गदर्शन शिबिरात अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या संख्येने आशा सेविका उपस्थित होत्या. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा उद्देश यामागे होता.

कार्यक्रमास डॉ. रवींद्र बनसोडे, योगेश बागल , डेंटल डॉ. प्रथमेश जोशी, आरएच अक्कलकोटच्या इन्चार्ज शितल जाधव, करजगीकर , एन. वाय. दलाल टीबी समुपदेशक , उज्वला फडतरे, श्रीमती वाघमारे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना राघवेंद्र करजगीकर यांनी केली, तर आभार प्रदर्शन उज्वला फडतरे यांनी मानले.

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांबाबत जनजागृती वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button