गावगाथा

श्रीशैल गंवडी यांचं व्यक्तीमत्व म्हणजे माणसं जोडणारं व्यक्तीमत्व – नगरसेवक महेश इंगळे

श्रीशैल गवंडी यांच्या वाढदिवसानिमीत्त स्वामींचे कृपावस्त्र देवून सत्कार केल्यानंतर चेअरमन महेश इंगळे यांचे गौरवोद्गार.

श्रीशैल गंवडी यांचं व्यक्तीमत्व म्हणजे माणसं जोडणारं व्यक्तीमत्व – नगरसेवक महेश इंगळे

श्रीशैल गवंडी यांच्या वाढदिवसानिमीत्त स्वामींचे कृपावस्त्र देवून सत्कार केल्यानंतर चेअरमन महेश इंगळे यांचे गौरवोद्गार.

(अक्कलकोट प्रतिनिधी, दि.०२/०५/२६)
येथील आपल्या श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्यालयीन व्यवस्थापक व देवस्थानचे सोशल मिडीया व वर्तमानपत्र प्रसिध्दी प्रमुख श्रीशैल गवंडी यांचे व्यक्तीमत्व म्हणजे खर्‍या अर्थानं माणसं जोडणारं व्यक्तीमत्व आहे कारण त्यांच्या वागण्या-बोलण्यातून नेहमीच आपुलकी, साधेपणा, प्रत्येकाशी स्नेहाने वागण्याची त्यांची शैली त्यांना वेगळेपण देऊन जाते म्हणून श्रीशैल गवंडी यांचं व्यक्तीमत्व म्हणजे माणसं जोडणारं व्यक्तीमत्व असल्याचे गौरवोद्गार श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी काढले.
नुकतेच देवस्थानचे प्रसिद्धी प्रमुख श्रीशैल गंवडी यांच्या वाढदिवसा निमित्त
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन / नगरसेवक महेश इंगळे यांनी श्रीशैल गवंडी यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, व मिठाई देवून व संत तुकाराम महाराजांची पगडी घालून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे बोलत होते.
यावेळी श्रीशैल गंवडी यांचा शहरातील विविध संस्था, पत्रकार बांधव संघटना, खाजप्पा झंपले मित्र परिवार, संतोष जमगे मित्र परिवार, आझाद हिंद मित्र मंडळ, सुदाम्याचे पोहे परिवार, देवस्थान कर्मचारी सेवेकरी, श्रीराम प्रतिष्ठान बहूउद्देशीय संस्था, स्विमींग ग्रुप,
खासबाग मित्र मंडळ, प्रा.शिवशरण अचलेर सर परिवार, सोलापूरचे उद्योगपती गणेश मालक कोळी व मित्रपरिवार, उपनगराध्यक्ष बंटी राठोड व मित्रपरिवार, विलास राठोड मित्रपरिवार, जनकल्याण परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
तर मुंबई येथील स्वामी भक्त व जेष्ठ विधीज्ञ मधुकर वैद्य, स्वामीभक्त सुभाष खाडीलकर, वडाळा मुंबई येथील सुरस्पर्श वाद्यवृंदचे प्रमुख व मुंबई आकाशवाणीचे निवेदक नितीन मिंडे, संजय मिंडे, कराड येथील महाराष्ट्रातील पहीले स्पर्धा परिक्षा केंद्राचे संस्थापक जीवन पवार सर व परिवार, अहिल्यानगरचे रहिवासी दिपक कटारिया, गणेश राजपूरे, उद्योगपती सागर देवकर, पाथर्डी माहूटा देवी देवस्थानचे विश्वस्त विक्रम वाडेकर, सातारा येथील राजाभाऊ पासलकर, नाशिक येथील विधिज्ञ सुहास खर्डे, सोलापूरचे स्वामी भक्त नितीन कोळी,
मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते व मित्र भाई मांजरेकर, पत्रकार झुंजार पेडणेकर, देवगड हडपीड स्वामी मठाचे प्रमुख नंदकुमार पेडणेकर, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील डॉ.पुष्कर निकम, कोल्हापूर स्वामीभक्त सुहास पाटील, पुण्यातील नगरसेवक रोहन बराटे, फिनिक्स मॉल पुणे येथील व्यवस्थापक नीरज रुईया, लोणावळा येथील स्वामी भक्त मिलिंद देशमुख, नागपूर येथील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख दिनकर कडू साहेब, छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक प्राणजीत गवंडी, नांदेड येथील वस्त्र उद्योजक श्रीनिवास मद्रेवार, आयपीएलचे प्रसिध्द समालोचक व मा.भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचे वडील शामलाल चोप्रा, माळशीस तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह देशमुख, सोलापूर सिध्देश्वर भक्त ग्रुपचे प्रमुख नमिता थिटे, मा.जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी साहेब, पुण्यातील मा.आमदार जगदीश मुळीक, सोलापूर जनता सहकारी बँकेचे मा.अध्यक्ष जगदीश तुळजापूरकर, सोलापूरचे मा.महापौर व शिवपार्वती हॉटेलचे मालक मनोहर सपाटे, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे व्यवस्थापक प्रकाश पाटील, अक्कलकोटचे उद्योगपती मित्र मुन्ना मालक राठौर, वैजनाथ मुकडे, हरीश पटेल, दिनेश पटेल, बाबा शेख, डॉ.हिरण्णा पाटील, उद्योगपती प्रशांत गुरव, भुमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट अधिक्षक मित्र संतोष बिराजदार, अफजलपूर येथील
डॉ.बसवराज उप्पार, दत्त मंदीर गाणगापूर मंदीराचे गुंडू पुजारी, हैदराबाद येथील कोफोर्ज या बहुराष्ट्रीय कंपनीमधील वरिष्ठ सुरक्षा विश्लेषक आणि व्यावसायिक एथिकल हॅकर स्वप्नजा जाधव मॅडम, अहमदाबाद येथील आय.टी.व्यवस्थापक व स्वामीभक्त मुकेश राखे, अक्कलकोट येथील गुरूवर्य डॉ.शिवराय आडवितोट, उद्योगपती सचिन किरनळ्ळी, धुळे येथील स्वामी भक्त विपूल दायमा, सोलापूरचे मा.रेल्वे व्यवस्थापक चंद्रकांत वाकडे, पिकनिक पॉईंट सोलापूरचे मालक कपिल बजाज, हॉटेल निसर्गचे मालक सुनिल ठेंगील, छत्रपती संभाजी नगर येथील उद्योगपती माधव डाखे, अमृतसर पंजाब येथील सुवर्ण मंदीरातील सेवेकरी आनंद सेहगल, पुण्यातील नातलग आनंद बोळबंडे, श्रीकांत बोळबंडे आदींसह अनेक ज्ञात अज्ञात नागरिकांनी व त्यांच्या शालेय जीवनातील मित्र मैत्रिणीनी व मित्र परिवारातील सदस्यांनी श्रीशैल गवंडी यांना दुरध्वनी / भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीशैल गवंडी यांनी सर्वांचे प्रेमपूर्वक शुभेच्छा मनापासून स्वीकार करत आहे असे सांगून सर्वांचे आभार मानत असेच सर्वांचे प्रेम आपल्यावर चिरंतन राहावे अशा प्रकारची प्रार्थना श्री स्वामी समर्थांच्या चरणी केली व सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा विशेष आदर केला. यावेळी त्यांचे मित्र प्रसाद सोनार, गणेश दिवाणजी, पत्रकार राजेश जगताप, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी,
महेश मस्कले, दीपक गवळी, चंद्रकांत कवटगी, नागेश घोसले, संजय पवार, रमेश शिंदे, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, अंकुश केत, संतोष पराणे आदि उपस्थित होते.

फोटो ओळ – वाढदिवसानिमित्त श्रीशैल गवंडी यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, गणेश दिवाणजी, प्रसाद सोनार, चंद्रकांत कवटगी व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button