गावगाथा

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा सत्कार सोहळा उत्साहात; सलून व्यावसायिकांसाठी ‘जपानी खुर्ची’ योजनेची मागणी

सत्कार

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा सत्कार सोहळा उत्साहात; सलून व्यावसायिकांसाठी ‘जपानी खुर्ची’ योजनेची मागणी

अक्कलकोट / प्रतिनिधी :
महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेतील नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दिपक वैध, उपाध्यक्ष श्री. इंद्रजीत पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. आनंद तानवडे, वागदरी गटाचे नुतन सदस्य श्री. प्रवीण तानवडे, करकंब गटाचे नुतन सदस्य श्री. आदिनाथ देशमुख तसेच शिरवळ पंचायत समिती गणाचे नुतन सदस्य श्री. गणेश मोरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निवेदनही देण्यात आले. जिल्हा परिषद शेष निधीतून ग्रामीण भागातील केशकर्तनालय (सलून) व्यावसायिकांसाठी ‘जपानी खुर्ची’ देण्याची योजना सुरू करण्यात यावी आणि ही योजना दरवर्षी राबवावी, अशी मागणी करण्यात आली. या योजनेमुळे ग्रामीण भागातील नाभिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव शेटे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय चिकले, उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे, सचिव भागवत विभुते, अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे, शहर अध्यक्ष लक्ष्मण विभुते, बापू काळे, सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन शेख, कुतुबुदीन शेख, महिला अध्यक्षा अनुराधा सुरवसे, युवती अध्यक्षा भाग्यश्री काळे, नागेश कोरे, संजय माने, पंकज सुरवसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे नाभिक समाजाच्या प्रश्नांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button