राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने प्राचार्य अनिल देशमुख सन्मानित
सोलापूर — शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे एस. एस. शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिल देशमुख यांना “एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य” यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ (सर), मुंबईचे नगरसेवक अंकुश कदम, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे, जिल्हा प्रमुख मनीष काळजे, प्रकाश नांगरे, महेश चिवटे, मंगेश चिवटे यांच्या हस्ते देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्रीशैल पाटील यांच्यासह किलजे सर, कलशेट्टी सर, बिराजदार सर, व्ही. के. देशमुख सर, जाधव सर, बाळासाहेब कुळकर्णी सर, घुगरे सर, होटकर सर, मठपती सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य अनिल देशमुख यांच्या शैक्षणिक नेतृत्वामुळे संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, शिस्त व नैतिक मूल्ये रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातून व विविध स्तरांवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!