श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात आज देऊळ बंद – २ चित्रपट टिझरचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते अनावरण.
अनावरण सोहळ्यास जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, प्रविण तरडे, नगरसेवक तथा चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती.
देऊळ बंद – २ चित्रपट २१ मे रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित – अभिनेते मोहन जोशी
(श्रीशैल गवंडी, दि.०७/०५/२६.अ.कोट)
सुमारे दहा वर्षांपुर्वी झालेले व श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्यावर आधारीत दिग्दर्शक प्रविण तरडे निर्मीत देऊळ बंद या मराठी चित्रपटास राज्यातील तमाम स्वामी भक्तांसह सर्वांनीच उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यानंतर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी मोठ्या भक्तीभावात देऊळ बंद २ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज या देऊळ बंद २ या मराठी चित्रपटाच्या टिझरचा अनावरण सोहळा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला. हा सोहळा देऊळ बंद – २ चित्रपटाचे दिग्दर्शक – अभिनेते प्रविण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, जेष्ठ अभिनेते स्वामी समर्थ फेम मोहन जोशी, निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी, जुईली वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते ऑनस्क्रीन बटन दाबून टिझरचा अनावरण सोहळा मोठया भक्तीभावात संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून २१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत होणारा हा देऊळ बंद २ हा मराठी चित्रपट स्वामी भक्तांनी जरूर पहावा असे आवाहन केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे,
विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, कोरिओग्राफर नंदकुमार जाधव, कुणाल मांजरेकर, चैतन्य दळवी, प्रद्युम्न जोशी, अभियंता नवनाथ बनकर, सुनिल नाईकवडी, सागर गोंडाळ, रमेश शिंदे,
विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सुनिल पवार, ओंकार महाडीक, अविनाश क्षीरसागर आदींसह देऊळ बंद २ चित्रपट संपूर्ण टीमसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(चौकट – श्री स्वामी समर्थांची भुमिका साकारल्यामुळे माझ्या अंगी असलेला अष्टपैलू अभिनेता समाज व स्वामी भक्तांनी पाहिला आहे. मुळातच मी स्वामी भक्त असल्याने स्वामींची व्यक्तीरेखा साकारणं हे माझ्यासाठी खुप मोठं आशिर्वाद आहे. देऊळ बंद २ या चित्रपटात शेतकरी कुटूंबानं घेतलेली देवाची परिक्षा हा अद्भुत प्रसंगावर विषय हाताळण्यात आला आहे जो स्वामी भक्तांना नक्कीच भावेल म्हणून सर्व स्वामी भक्तांनी हा चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर नक्कीच पहावा – जेष्ठ अभिनेते मोहन जोशी – मुंबई,
श्री.स्वामी समर्थ फेम, देऊळ बंद २)
……………………………………………..
(चौकट – प्रविण तरडे सारख्या नास्तिक माणसाला स्वामींनी भक्तीमार्ग दाखवून त्याचे जीवन व संसार उभे केले आहे, म्हणून स्वामी भक्तानी व नागरिकांनी आपल्या कष्टा सोबत नियमीतपणे स्वामींचे नाम घ्यावे बाकी आपल्या जीवनाचे कल्याण करण्यास स्वामी समर्थ आहेतच. देऊळ बंद या शिर्षकावर स्वामींच्या विविध भक्तीमार्गावर आपण भविष्यात एकूण ११ भाग प्रदर्शीत करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला स्वामी यश देतीलच, त्यापैकी आता देऊळ बंद २ प्रदर्शीत होत आहे, त्याला स्वामी भक्त निश्चीतच दाद देतील – प्रविण तरडे – पुणे, दिग्दर्शक देऊळ बंद २)
……………………………………………
चौकट – जवळपास दहा वर्षांपुर्वी दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या कडून सुरुवातीला चित्रपटाचे देऊळ बंद हे नाव ऐकून मला खुप आश्चर्य वाटले, परंतू त्यांनी नंतर कथेचा मुख्य गाभा समजावून सांगीतला. मग आम्ही चित्रपटाच्या चित्रीकरणास संमती दिली होती. म्हणजे थोडक्यात नास्तिक माणूस देवाचं देऊळ बंद करायला निघतो म्हणून देऊळ बंद हे शिर्षक देण्यात आलं आहे.
देऊळ बंद १ मध्ये स्वामी समर्थ प्रत्यक्षात वैज्ञानिका समोर येतात आणि त्याचीच परीक्षा घेतात. शेवटी तोच शास्त्रज्ञ स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो. आता
देऊळ बंद २ या दुसऱ्या भागात टॅगलाइन आहे आता परीक्षा देवाची पहिल्या भागात भक्ताची परीक्षा होती, आता देवाची परीक्षा आहे. पोस्टरमध्ये पण स्वामी प्रसन्न आहेत पण भक्त रागात आहे.थोडक्यात देऊळ बंद हे नाव श्रद्धा विरुध्द अश्रद्धा या संघर्षाचं प्रतीक आहे. देव नाकारणारा माणूस शेवटी देवाला शरण जातो हीच सिनेमाची थीम आहे.
प्रविण तरडेंनी खूप विचार करून हे नाव दिलंय. प्रविण तरडे यांच्यावर श्री स्वामी समर्थाची नक्कीच कृपा आहे, म्हणूनच त्यांच्या चित्रपट सेवेला स्वामींनी भरभरुन यश व समृध्दी दिली आहे असेच यश देऊळ बंद २ या चित्रपटालाही स्वामी नक्कीच देतील असा विश्वास व्यक्त करतो व माझ्या कडून तसेच देवस्थानचे सर्व विश्वस्त पदाधिकारी व मित्रमंडळी कडून आज संपन्न झालेल्या देऊळ बंद २ या चित्रपटाच्या टीझर अनावरण सोहळ्यास व चित्रपटाच्या प्रदर्शनास शुभेच्छा व्यक्त करतो. ॥ श्री स्वामी समर्थ॥ – श्री.महेश क.इंगळे – चेअरमन श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट/ मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, नगर परिषद, अक्कलकोट)
…………………………………………….
विशेष अधिकृत
लेखन हक्क – श्रीशैल गवंडी
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट
फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कै.कल्याणराव इंगळे सभामंडपात देऊळ बंद २ या मराठी चित्रपटाच्या टिझर अनावरण प्रसंगी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, प्रविण तरडे, उद्योजक निर्माते कैलास वाणी, जयश्री वाणी, कोरीओग्राफर नंदकुमार जाधव, अभिनेत्री स्नेहल तरडे, घाटगे सर, विश्वस्त महेश गोगी व उपस्थित अन्य कलाकार व स्वामी भक्त दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!