गावगाथा

तालुक्यातील एस.एस.सी.गुणवंत विद्यार्थी कृष्णा सुरवसे याचा स्वामींचे कृपावस्त्र देऊन महेश इंगळे यांच्या हस्ते झाला सन्मान.

कृष्णा सुरवसे याचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

तालुक्यातील एस.एस.सी.गुणवंत विद्यार्थी कृष्णा सुरवसे याचा स्वामींचे कृपावस्त्र देऊन महेश इंगळे यांच्या हस्ते झाला सन्मान.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०९/०५/२६)
पुणे बोर्डाच्या वतीने मार्च २६ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत
येथील मंगरुळे प्रशालेचा विद्यार्थी कृष्णा सुरवसे हा ९७.८०% गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला आहे. त्याच्या या उज्वल यशाबद्दल येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी कृष्णा सुरवसे याचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना महेश इंगळे म्हणाले की कृष्णा सुरवसे यांचे वडील म्हणजे प्रकाश सुरवसे हे आमचे जवळचे मित्र व बोरगाव देशमुख येथील विद्या विजय प्रशालेचे संचालक तसेच येथील खेडगी महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत त्यामुळे कृष्णा सुरवसे याला त्याचे वडील प्रकाश सुरवसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. प्रकाश सुरवसे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे व कृष्णा सुरवसे यांच्या अथक परिश्रमामुळे त्याला हे यश संपादन झाले असल्याचे सांगितले व त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने व सर्व मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, सुनील पवार, व सुरवसे कुटुंबीय उपस्थित होते.

फोटो ओळ – कृष्णा सुरवसे याचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button