गावगाथा

कर्तव्य फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप

शालेय साहित्याचे वाटप

कर्तव्य फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप
पुणे : कर्तव्य फाऊंडेशनच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त कॅम्प परिसरातील सेंट मार्गारेट शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तरांचे मोफत वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे होते. यावेळी भाजपाचे शशीधर पूरम, अरविंद बुधाणी, डॉ. कांतीलाल कावेडीया, सीए अरविंद खंडेलवाल, डॉ. बंटी धर्मा, पश्चिम मध्य रेल्वेचे सीईओ मोहन दुधाणे, प्रवीण गाडे, मन्सूर शेख, शाम साहनी, रवीशेठ पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कर्तव्य फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, कार्याध्यक्ष अशोक देशमुख, उपाध्यक्ष मोहसीन शेख, विजय भोसले, ज्ञानेश्वर कांबळे, मनजीतसिंग विरदी, आय. टी. शेख, सुशील खंडेलवाल, बबलू सय्यद, संजय गायकवाड, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कलकुटी मॅडम, विधाते मॅडम आणि शिक्षकवृंद यांचीही यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, प्रामाणिकपणे अभ्यास करून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्य फाऊंडेशन गेल्या नऊ वर्षांपासून विविध शैक्षणिक, सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम राबवत असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा त्याचाच एक भाग असल्याचे यावेळी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दप्तरांचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. उपस्थित पालक व शिक्षकांनी कर्तव्य फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत, अशा समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा भविष्यातही कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button