लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट
पदाधिकाऱ्यांचा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१९/०७/२६)
येथील लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक आदरणीय महेश मालक इंगळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे नूतन अध्यक्ष लायन अभय खोबरे, सचिव लायन शिरीष पंडित, आणि खजिनदार लायन विठ्ठल तेली यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन महेश इंगळे यांचे म्हणाले की लायन्स क्लब समाज सेवेचे उत्तम कार्य करत आहे.
स्वामींच्या आशीर्वादाने नूतन कार्य कारिणीला आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांसाठी अधिक बळ मिळो असे सांगून देवस्थान आणि लायन्स क्लबचे शैक्षणिक उपक्रम अक्कलकोटच्या शैक्षणिक विकासात भविष्यात नक्कीच क्रांती घडवतील असा मनोदय व्यक्त करुन लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी देवस्थानच्या सत्काराबद्दल आभार मानले आणि पुढील काळात देवस्थानच्या सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी लायन्स क्लबचे सदस्य लायन शिवपुत्र हळगोदे, ला.राजेंद्र हत्ते, प्रभाकर मजगे, डॉ.प्रदीप घिवारे, डॉ. सुनिल बिराजदार, ला.कल्याणी आळगी, ला.शिवानंद नंदर्गी, ला.मल्लीनाथ साखरे, ला.कमल अळ्ळाळी, ला.शिरीश पंडीत, ला. संतोष जिरोळे, ला.राजशेखर हिप्परगी, ला.शिवशरण खुबा, ला.सुभाष गडसिंग, ला.बाबासाहेब निंबाळकर, ला. सुधीर माळ्शेट्टी, ला.मल्लकार्जुन मसुती, ला.जलील वळसंगकर, ला.चेतन जाधव
आदींसह लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट आणि देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे मित्र परिवार सदस्य प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, संतोष फुटाणे जाधव, तुषार मोरे, रमेश शिंदे उपस्थित होते.
फोटो ओळ – लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे नूतन अध्यक्ष लायन अभय खोबरे, सचिव लायन शिरीष पंडित व खजिनदार लायन विठ्ठल तेली यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रतिमा, प्रसाद देऊन सन्मान करताना चेअरमन महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!