गावगाथा

ग्लोबल होणाऱ्या चित्र – शिल्पकलेला आपण जपले पाहिजे – कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस

होम मैदानावर चार दिवसीय चित्र शिल्प प्रदर्शन, प्रात्यक्षिक सुरू

ग्लोबल होणाऱ्या चित्र – शिल्पकलेला आपण जपले पाहिजे
– कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस
होम मैदानावर चार दिवसीय चित्र शिल्प प्रदर्शन, प्रात्यक्षिक सुरू
सोलापूर प्रतिनिधी ( दिनांक १९ )


” चित्रकलेच्या साधनेतून मन एकाग्र करण्याची शक्ती मिळते, त्यातून कलाकार अप्रतिम कलाकृती साकारतो. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्लोबल होणाऱ्या चित्रकलेला आपण जपले पाहिजे.” असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी केले. त्या श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी आणि कर्मयोगी कै. अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्र शिल्प प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकाच्या चार दिवसीय सत्राच्या उद्घाटन सत्रात काल बोलत होत्या. हे प्रदर्शन होम मैदानावरील बास्केटबॉल शेजारच्या दालनामध्ये भरवण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रा कमिटी अध्यक्ष तथा विश्वस्त सिद्धेश्वर बमणी , प्राचार्य दीपक पाटील उपस्थित होते.


प्रारंभी फीत कापून दालनाचे उद्घाटन झाले. मान्यवरांनी कलाकारांशी संवाद साधत त्यांच्या अप्रतिम कलाकृती पाहिल्या. रंगांचे माध्यम जाणून घेत व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे आगमन झालं. त्यानंतर दीप प्रज्वलन करून सत्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविकात प्राचार्यांनी चार दिवसिय सत्रातील ठळक कार्यक्रम सांगितले.चित्रकार प्रवीण रणदिवे यांचे १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता , चित्रकार सहदेव भालेकर यांचे २० जानेवारीला सकाळी ११ वाजता, चित्रकार नितीन खिलारे २१ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता, शिल्पकार धर्मराज रामपुरे यांचे शिल्प प्रात्यक्षिक २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता ठेवण्यात आले आहे.
आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी कर्मयोगी अप्पासाहेबांच्या कलेबद्दलच्या आठवणींना उजाळा देत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय एक वेगळे युनिट आहे. इथले विद्यार्थी अनेक महोत्सवात आपली कला सादर करतात. त्यांना व्यासपीठ मिळावे या हेतूने देवस्थाने हा अभिनव उपक्रम राबविला आहे. असे सांगितले. कुलगुरूंचे मनोगत संपेपर्यंत स्नेहा मेले या विद्यार्थिनींने कुलगुरूंचे लाईव्ह प्रोट्रेट काढून भेट दिली.
याप्रसंगी देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त विश्वनाथ लब्बा, नीलकंठप्पा कोनापुरे गुरुराज माळगे, शिवकुमार पाटील, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी,प्राचार्य राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, संगमेश्वर कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक,रसिक,विद्यार्थी उपस्थित होते. संतोष पवार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार श्रेया माशाळ हिने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button