ग्रामीण खाद्य संस्कृती

संपूर्ण जगात फेमस असलेल्या सोलापुरी शीकची सिक्रेट रेसिपी

मटण भाजण्याच्या खास पद्धतीला शीक असं म्हंटलं जातं. सोलापुरात येणारे पाहुणे सोलापुरी चादर घ्यायला आणि शीक मटण खायला कधी विसरत नाहीत.

संपूर्ण जगात फेमस असलेल्या सोलापुरी शीकची सिक्रेट रेसिपी
मटण भाजण्याच्या खास पद्धतीला शीक असं म्हंटलं जातं. सोलापुरात येणारे पाहुणे सोलापुरी चादर घ्यायला आणि शीक मटण खायला कधी विसरत नाहीत.

HTML img Tag Simply Easy Learning    

मराठी, कन्नड आणि तेलुगू या तीन भाषिकांची लक्षणीय संख्या असलेलं सोलापूरची खाद्य संस्कृती ही राज्यात प्रसिद्ध आहे. शेंगाची चटणी, कडक भाकरी हे पदार्थ म्हंटले की सोलापूरची हमखास आठवण होते. त्याचबरोबर सोलापूर शिकमुळे देखील प्रसिद्ध आहे. मटण भाजण्याच्या खास पद्धतीला शीक असं म्हंटलं जातं. सोलापुरात येणारे पाहुणे सोलापुरी चादर घ्यायला आणि शीक मटण खायला कधी विसरत नाहीत. अनेक सेलिब्रेटी तसंच देशभरातील फुड ब्लॉगरनंही सोलापुरी शिकचं कौतुक केलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

मटन किंवा चिकन शिक बनते कसे?
शिक साठी लागणारे मटण किंवा चिकन हे सुद्धा स्पेशल प्रकारात तोडावे लागते.
म्हणजेच प्रत्येक पीसच्या पृष्ठभागी छोटे-मोठे कट्स घ्यावे लागतात.
– अगदी स्वच्छ पाण्याने ते मटण प्रथम धुवून घ्यावे.
एका भांड्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, हळद ,मीठ धने पावडर ,पिवळा मसाला ,काळा मसाला, मटन मसाला, विशिष्ट काळा तिखटातील सोलापुरी मसाला, इलायची, लवंग ,कांद्याची पेस्ट, शहाजीरा, काजू करी,काळीमिरी तुमच्या अंदाजानं टाकावे.

HTML img Tag Simply Easy Learning    

– कटिंग केलेल्या सर्व मटण पिसेसमध्ये मसाला जाईल या पद्धतीने हे सर्व एकजीव करून घ्यावेत.
गरम मसाल्यांसोबत हे लावलेले मिश्रण दोन ते अडीच तास मॅरीनेट करून घ्यावेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

-त्यानंतर एका लोखंडी सळईला व्यवस्थितपणे एका मागून एक असे पिसेस लावून घ्यावेत.
कोळशाच्या आरावर ते मटण भाजत असताना एक काळजी घ्यावी की कोळशातून येणारी आग आणि मटणामध्ये असणारे मसाले हे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

– सतत कोळशाच्या आरावर ठेवून हे मटन भाजून घ्यावे.

– मटन आणि मसाला शिजल्याचा विशिष्ट वास आल्यावर हे गरम पिसेस एका पातेल्यात काढून घ्याव्यात.

– त्यानंतर गॅसवर एका पातेल्यात लोणी टाकून हे कोळशाच्या आरावरून भाजून काढलेले पीस आणि लोणी एकजीव करून घ्यावे.

हीच रेसिपी मटन शिकसाठीही लागू होते
गेल्या सात ते आठ वर्षापासून मी हॉटेल व्यवसायात आहे. सोलापूरची ओळख फक्त शिक मुळेच आहे. अगदी उत्तम क्वालिटीचे मटण किंवा चिकन वापरून आम्ही ग्राहकांच्या सेवेत आहोत. वीकेंडला साधारणपणे 30 ते 35 किलो शिक मी स्वतः करून विकतो. यात अगदी मन लावून मी शिक स्वतः बनवतो. त्यामुळे उत्तम क्वालिटी देण्याचा प्रयत्न मी यातून करतो असे मत दख्खनचा वाडा या हॉटेलचे विवेक मोरे यांनी व्यक्त केले.

अधिक माहितीसाठी संपर्क

विवेक मोरे -9765443837

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button