घोळसगाव येथे सद्गुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात देश भक्ती कार्यक्रमसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन…
शनिवार दि.२१ रोजी पहाटे श्री चे महापूजा, म्हारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होमहवन इत्यादी कार्यक्रम होणार
घोळसगाव येथे सद्गुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात देश भक्ती कार्यक्रमसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन…
अक्कलकोट दि. १६ (प्रतिनिधि)
अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव आणि उमरगा तालुक्यातील बोळेगाव सरहद्दीवर वसलेले स्वयं जागृत श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान येथे शनिवार दि. २१ रोजी दिवसभर जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात देश भक्ती कार्यक्रमसह विवध धार्मिक, कर्यक्रम होणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील घोळसगाव आणि मराठवाड्यातील बोळेगाव सरहद्दीवर वसलेले शनेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारा स्वयं जागृत सर्व धर्मीय श्रद्धास्थान देवस्थान आहे. प्रत्येक शनी अमावस्या यात्रेस तुळजापूर, उमरगा, आंळद व अक्कलकोट तालुक्यातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.यामुळे यंदा यात्रा कमिटीचे वतीने शनी अमावास्या यात्रेची जयत्त तयारी करण्यात आले आहेत. शनिवार दि.२१ रोजी पहाटे श्री चे महापूजा, म्हारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होमहवन इत्यादी कार्यक्रम होणार असून सकाळी सात वाजता घोळसगाव ग्राम प्रदिक्षण करीत श्रीचे भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्य समवेत श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान पर्यत निघणार आहे. यानंतर सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचा दर्शन सोहळा, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम होणार असून भाविक भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादचा आवश्य लाभ घ्यावी असे आवाहन एका पत्रकाद्वारे यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.