*विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन अनिलशेठ गाडवे व संचालक रवींद्र महाजन यांचा महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेत सत्कार*
सत्कार समारंभ

*विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन अनिलशेठ गाडवे व संचालक रवींद्र महाजन यांचा महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेत सत्कार*
पुणे : महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, पुणे यांच्या वतीने सदाशिव पेठ येथील संस्थेच्या कार्यालयात विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन मा.अनिलशेठ गाडवे व संचालक मा. रवींद्र महाजन यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.

सोमेश्वर वाडी, पुणे शहर अध्यक्ष महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा यांच्या हस्ते गाडवे व महाजन यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोघांचे अभिनंदन करून त्यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला.
या प्रसंगी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेश समितीचे सरचिटणीस मा. बाळासाहेब होनराव, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेंद्र गाढवे, माणिक कस्तुरे, उमेश जयंत संगमनेरकर, सागर मांडे, उत्कर्ष पंढरीनाथ लांडगे ,संदीप सुधाकर हलगणे, रविकिरण सिद्धाराम पाटील, शिवप्रसाद श्रीशैठ्य बिराजदार, सुरेश गंगाधर हिंगमिरे, दत्तात्रय रामचंद्र लोडगे, रवींद्र गणपत होडगे, राणेश गंगाधर हिंगमिरे, अनिल व्ही. भत्ते, अच्युत नवाळे, शिवानंद पाटील, किशोर बाबुराव वारीकर, सिद्धू गोगी यांच्यासह सभेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांचे कौतुक करत समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. सत्कार समारंभ आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



