दानशूर वागदरीकरांचा जिल्हा परिषद शाळेकडून भव्य सत्कार
विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या भौतिक सुविधांचा गौरव; कृतज्ञतेच्या सोहळ्यात समाजाच्या शिक्षणप्रेमाला सलाम

दानशूर वागदरीकरांचा जिल्हा परिषद शाळेकडून भव्य सत्कार
विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या भौतिक सुविधांचा गौरव; कृतज्ञतेच्या सोहळ्यात समाजाच्या शिक्षणप्रेमाला सलाम
वागदरी | प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या विकासासाठी उदार हस्ते योगदान देणाऱ्या दानशूर वागदरीकरांचा शाळेच्या वतीने भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या दात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली.
यावेळी शाळेला २०० स्टील ताटांची भेट देणारे श्री. इरण्णा करजगी व श्री. विश्वनाथ करजगी, उच्च दर्जाची साऊंड सिस्टिम भेट देणारे श्री. शिवराज पोमाजी यांच्या वतीने श्री. अभिजीत पोमाजी, तसेच शाळेच्या प्रवेशद्वारासाठी लोखंडी गेट उभारून देणारे श्री. बाबासाहेब बनसोडे (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मुलींची शाळा, वागदरी) यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वागदरी गटाचे केंद्रप्रमुख श्री. सुनील इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस. एस. शेळके प्रशालेचे निवृत्त शिक्षक श्री. यमाजी सर, गावचे माजी सरपंच व विद्यमान प्रशासक श्री. शिवानंद घोळसगाव, माजी सरपंच श्री. श्रीकांत भैरामडगी, सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश मंगाने, श्री. महादेव सोनकवडे, श्री. श्याम बाबर, श्री. शिवशरण (अण्णा) सुरवसे, समाजसेवक श्री. वीरभद्र पुरंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कडाजी सूर्यवंशी (मुले), श्री. मारुती शिंदे (मुली), सदस्य श्री. गजानन सुरवसे, श्री. राम चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. पाटील सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दानशूर व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करत, समाजाच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी सौ. कलशेट्टी मॅडम (मुख्याध्यापिका), श्री. बागवान सर, श्री. मुरटे सर, श्री. पाटील सर, श्री. भास्कर सर, सौ. गिरी मॅडम, सौ. फड मॅडम, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व दानशूर व्यक्तिमत्त्वांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या उदार सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होत असून, भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
फोटो कॅप्शन :
वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेत आयोजित कृतज्ञता सोहळ्यात शाळेला विविध साहित्य व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्त्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


