हडपसर व येरवडा येथील अमर गायक मोहम्मद रफी, मुकेश, किशोरदा आर्ट संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांसाठी मोफत हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजन
कार्यक्रम विशेष

*पुणे:-* हडपसर व येरवडा येथील अमर गायक मोहम्मद रफी, मुकेश, किशोरदा आर्ट संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांसाठी मोफत हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.*
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यनगरीचे माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, माजी नगरसेवक सागर माळकर, माजी नगरसेवक हुलगेश चलवादी, औंध येथील एम्स हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे रुग्ण व सामाजिक कल्याण प्रमुख डॉ.अशोक घोणे, अष्टविनायक भुषण पुरस्कार विजेते डॉ.सुनिल देवढे, माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश ओव्हाळ, भीम आर्मी कोअरकमिटीचे सुधिर जगताप, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव समितीचे संस्थापक सयाजी ओव्हाळ, अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल भगवान जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी अनेक मान्यवर गायक आपली देश भक्तिपर गीते सादर करणार आहेत.
*सदर कार्यक्रम येरवडा येथील अण्णाभाऊ साठे कलामंदिर येथे आज दि.२१/०१/२०२३ रोजी सायं. ५ वा. आयोजित करण्यात आला आहे.*
कार्यक्रमाचे संयोजन आर्ट संस्थेचे संस्थापक राजकमल शिंदे व सहसंयोजन गायक कलाकार विजय महादेव कांबळे यांनी केले आहे.
