गौडगांब येथील दक्षिणमुखी जागृत मारूती मंदिरात शनि अमावस्येनिमित्त लाखो भाविक मारुती चरणी लीन…
शनि अमावस्याच्या औचितसाधून जागृत मारूती अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचे आयोजन ..

गौडगांब येथील दक्षिणमुखी जागृत मारूती मंदिरात शनि अमावस्येनिमित्त लाखो भाविक मारुती चरणी लीन…


शनि अमावस्याच्या औचितसाधून जागृत मारूती अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचे आयोजन …

अक्कलकोट — शनि अमावस्येनिमित्त गौडगांब येथील दक्षिणमुखी जागृत मारूतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश,तेलंगणासह अन्य राज्यातील हजारो भाविकांनी शांततेत मारुती चरणी लीन झाले.जय हनुमान ज्ञान गुन सागर।जय कपीस तिहुँ लोक उजागर॥राम दूत अतुलित बल धामा।अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥ महाबीर बिक्रम बजरंगी…’श्रीराम- लक्ष्मण -जानकी,’ ‘जय हनुमान की च्या जयघोषाने गौडगावची पहाट उजळून निघाली होती.
शनिवारी शनि अमावस्या असल्याने पहाटे ३ वाजेपासुन दक्षिणमुखी जागृत मारूतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.शनिवारी पहाटे ३ ते ५ या वेळेत शेकडो भाविकांनी मारूतीस महारुद्वा अभिषेक केले.५ते६ पर्यंत होमहवन तर ७ वाजता महाआरतीचा विधी पार पडला.या सर्व विधीचा लाभ हजारो भाविकांनी घेत तुप्त होत समाधान व्यक्तत केले.

यावेळी श्री मारूतीच्या दर्शनासाठी आलेल्या भविकांच्या लांबच्या लांब रांगा लागले होते.दर्शनाची सुलभ सोय करण्यात आली होती.यावेळी राज्य, परराज्यातुन आलेल्या लाखो भाविकांनी शांततेत श्रीचे दर्शन घेतले. दर्शन रांगेत प्रथम थांबलेल्या मिथुन कलमाने,रविंद्र वानेगांव,किरण भंगरर्गी या भक्तांना बाराची काकड आरतीचा मान मिळाला. तसेच मारुतीच्या दर्शनासाठी आलेले तुळजापूरचे रहिवासी सचिन बनसोडे यांनी मंदिरासाठी एक लाख रक्कमेची ५५ इंची एलईडी टीव्ही भेट स्वरूपात दिली आहे.

राज्य व पराज्यातून आलेल्या मारुती भक्तांना जिल्हा कलबुर्गी ता.आळंद येथील खजुरी गावचे उदयोजक तथा मारूती भक्त मिथुन अप्पाराव कलमाने,रविंद्र वानेगांव,किरण सदाशिव भंगरर्गी यांच्या वतिने शनि अमावस्याच्या औचितसाधून जागृत मारूती अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचे आयोजन केले होते.अन्नछत्र मंडळात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांची लगबग सुरू होती.यावेळी अध्यक्ष श्रीकांत खानापुरे,
सिद्राम वाघमोडे,प्रकाश म्हेथें,श्रीमंत कुंभार,श्रीमंत म्हेत्रे, श्रीशैल कुंभार,श्रीमंत सावळतोट,शिवानंद फुलारी,चौडप्पा सोलापूरे आदीनी परिश्रम घेतले.