निसर्ग सेवा फाउंडेशन अक्कलकोट च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अक्कलकोट चकाचक करत आहे..
आदर्श उपक्रम राबविणारे निसर्ग सेवा फाउंडेशन

निसर्ग सेवा फाउंडेशन अक्कलकोट सामाजिक बांधिलकी जपत अक्कलकोट चकाचक करत आहे..


निसर्ग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून बस डेपो समोरीलफुटपाथ वरील संपूर्ण काटेरी झाडे झुडपे काढण्यात आली. यामुळे फुटपाथ मोकळी होऊन श्री तिर्थ क्षेत्र नगरीचे झालेले विद्रोपीकरणं दूर झाले . तसेच फुटपाथ वर अस्वच्छता सर्वत्र दुर्गंधी यामुळे नागरिकांना व स्वामी भक्तांना येता जाता त्रास होत होता हीच बाब लक्षात ठेवून सदर परिसर स्वच्छ करण्यात आले. यामुळें फुटपाथ वर ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना बालकांना चालत जाण्यास निश्चितच मदत होणार आहे. या प्रसंगी सर्व स्वयंसेवक मोठ्ठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यानंतर श्री ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले. सद्या हिंदूंचा पवित्र समजला जाणारा श्रावण महिना असल्याने मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. भाविकांना स्वच्छ,सुंदर व प्रसन्न वातावरण राहावे .त्या दृष्टीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आले होते. निसर्ग सेवा फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमचे भाविकांनी समाधान व्यक्त करून कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

