शारदीय नवरात्र महोत्सवानिमीत्त श्री वटवृक्ष मंदिरात पारंपारिकरित्या श्री देवीजींची स्थापना व घटस्थापना
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाली देवीजींची महाआरती
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२२/०९/२५)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज सोमवार दिनांक २२/०९/२०२५ घटस्थापना ते गुरूवार दिनांक ०२/१०/२०२५ विजया दशमी दसरा अखेर श्री देवीजींची स्थापना व घटस्थापना देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात
मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावात संपन्न झाली. यावेळी महेश इंगळे यांच्या हस्ते देवीजींची महाआरती संपन्न झाली.
या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी वटवृक्ष मंदिरातील नवरात्र महोत्सवास जुनी परंपरा व ऐतिहासिक वारसा आहे. या नवरात्री महोत्सवास अनन्य साधारण असे महत्वही आहे. या नवरात्र महोत्सव कालावधीत सालाबादा प्रमाणे यंदाही देवस्थानच्या वतीने शुक्रवार दिनांक २६/०९/२०२५ ते रविवार दिनांक २८/०९/२०२५ या कालावधीत सकाळी ९ ते ११ या वेळेत ३ दिवसीय “देवी महात्म्य” या पोथीच्या पारायण सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. ही “देवी महात्म्य” पोथीची पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही जास्तीत जास्त पुरुष व महीला भक्तांनी या पारायण सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन महेश इंगळे यांनी भाविकांना केले आहे. सोमवार दिनांक ६/१०/२०२५ कोजागरी पौर्णिमे रोजी देवस्थानकडुन महानैवेद्य दाखवून दुध प्रसाद वाटप होवून या उत्सवाची सांगता होईल अशी माहिती देवून महेश इंगळे यांनी सर्व देवी भक्तांना व स्वामी भक्तांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, मोहित पुजारी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, स्वामीनाथ लोणारी, रविराव महिंद्रकर, महेश मस्कले, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार, विपूल जाधव, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात श्री देवीजींच्या स्थापनेनंतर देवीजींची महाआरती करताना महेश इंगळे, मंदार महाराज पुजारी व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!