गावगाथा

सोलापूर शहरासह अन्य शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे दोन आकस्मिक आरक्षण मंजूर..!

सोलापूर नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठकआज संपन्न झाली.

सोलापूर शहरासह अन्य शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे दोन आकस्मिक आरक्षण मंजूर..!
सोलापूर नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठकआज संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण चे अधीक्षक अभियंता एस खांडेकर, कार्यकारी अभियंता धीरज साळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपअभियंता कैलास चौधरी आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून बचत करण्याचे आवाहन केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे 5.50 टीएमसी चे दुसरे आवर्तन तर 6.50 टीएमसी चे तिसरे आवर्तन सोडण्यासाठी आज मंजुरी प्रदान केली.

HTML img Tag Simply Easy Learning    

जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचणी येणार नाही या अनुषंगाने जलसंपदा विभागाने उजनी धरण प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे व विविध पाणीपुरवठा योजनेला आवश्यक असलेले पिण्याच्या पाण्याचे आकस्मिक आरक्षण करून ठेवावे व ते पाणी आवर्तन नियोजित वेळेप्रमाणे भीमा व सीना निधीतून द्यावे. पाणी आवर्तन देत असताना पाण्याची बचत व्यवस्थितपणे होईल या दृष्टीने विचार करावा व त्यानुसार जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी असेही सूचित केले.
प्रारंभी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणचे श्री. खांडेकर यांनी उजनी धरणात 29 जानेवारी 2025 रोजी उपयुक्त पाणीसाठा 40. 59 टीएमसी असून अचलपाणी साठा 63.66 टीएमसी आहे तर एकूण पाणीसाठा 104.25 टीएमसी इतका असल्याचे सांगितले. तसेच सोलापूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजना साठी उजनी धरणातून भीमा नदीत सहा टीएमसी पाणी आवर्तन यापूर्वी सोडलेले असून या पाणीपुरवठा योजनेसाठी पिण्याच्या पाण्याचे दोन आकस्मिक आरक्षण देणे शक्य असून त्याची सविस्तर माहिती दिली.
तसेच सोलापूर शहर व भीमा नदी काठावरील इतर पाणीपुरवठा योजनेसाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडणे आवश्यक होते, परंतु पालकमंत्री महोदयांची नियुक्ती न झाल्यामुळे जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीची बैठक घेता आली नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री यांची मान्यता घेऊन भीमा नदीचे पहिले आवर्तन पूर्ण केल्याची माहिती श्री. खांडेकर यांनी देऊन पुढील नियोजित वेळेनुसार आज रोजी समितीने दिलेल्या मान्यतेप्रमाणे दुसरे व तिसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button