पुस्तक प्रकाशन

शरद पवार आणि महाराष्ट्र – भाग १’ (पश्चिम महाराष्ट्र) या ग्रंथाचा *प्रकाशन सोहळा रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे* येथे आयोजित करण्यात आला आहे.

पुस्तक प्रकाशन समारंभ

शरद पवार आणि महाराष्ट्र – भाग १’ (पश्चिम महाराष्ट्र) या ग्रंथाचा *प्रकाशन सोहळा रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे* येथे आयोजित करण्यात आला आहे.

शरद पवार… गेली ५० हून अधिक वर्षे सातत्याने चर्चेत राहिलेले आणि सर्वार्थाने ज्येष्ठ म्हणता येईल असे नाव. त्यांची सार्वत्रिक ओळख राजकारणी अशी असली, तरी त्यांनी कधीच स्वत:ला केवळ राजकारणापुरते बंदिस्त ठेवले नाही. राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक – आर्थिक – क्रीडा – आरोग्य – कृषी – ग्रामीण व शहरी विकास अशा विविध क्षेत्रांत त्यांचा लीलया वावर राहिला. त्यामुळेच गावोगावी होणाऱ्या चर्चा असोत वा राजकारणावरील अभ्यासकांचे चर्चासत्र असोत, तिथे पवार विषय निघतोच. विरोधकांकडून होणारी टीका असो वा मार्गदर्शन असो, पवार विषय असतोच. आपत्तीनंतरची मदत असो वा शेतकरी – सर्वसामान्यांसाठी कैफियत मांडण्याचे हक्काचे ठिकाण असो, तिथे पवार असतातच. त्यामुळेच, देशात, राज्यात काहीही घडले की त्यामागे पवारांचा ‘अदृश्य’ हात असल्याचीही चर्चा होत असते. ‘Love him or hate him, but you can’t ignore him’ हे वाक्य पवारांना अगदी तंतोतंत लागू होते.
अशा या ‘सर्वव्यापी’ पवारांचे कर्तृत्व केवळ त्यांच्या पक्षाच्या संख्याबळानुसार पाहता येत नाही. तर, आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांनी पाठबळ दिलेल्या व्यक्ती आणि संस्थांच्या पसाऱ्यातून त्याचा एक अंदाज येऊ शकेल. व्यक्तींच्या, संस्थांच्या, धोरणांच्या, निर्णयांच्या वाटचालीतून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात दिलेले योगदान आणि त्यासाठीची दूरदृष्टी याची प्रचीती येईल.
पवारांनी उभ्या केलेल्या संस्था, मदत केलेल्या संस्था, बळ दिलेल्या व्यक्ती, मुख्यमंत्री व केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे झालेले बदल, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सामाजिक – राजकीय – सांस्कृतिक जडणघडणीचा दस्तऐवज व्हावा, या उद्देशाने आमच्या *स्ट्रॅटेजी कॉर्पोरेशन, पुणे* या संस्थेतर्फे ‘शरद पवार आणि महाराष्ट्र’ या ग्रंथमालिकेचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या ग्रंथमालिकेतून महाराष्ट्राच्या विभागनिहाय खंडांतून प्रत्येक जिल्ह्याशी पवारांचे असलेले नाते व त्या जिल्ह्यासाठीचे त्यांचे योगदान उलगडण्यात येणार आहे. या प्रकल्पातील ‘शरद पवार आणि महाराष्ट्र – भाग १’ (पश्चिम महाराष्ट्र) या ग्रंथाचा *प्रकाशन सोहळा रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे* येथे आयोजित करण्यात आला आहे.
*तर, या प्रकाशन सोहळ्याला नक्की या…. गेल्या ५० वर्षांत शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले? आपल्या जिल्ह्यासाठी – तालुक्यासाठी, आपल्या आजूबाजूच्या गावांच्या प्रगतीत पवारांचे योगदान काय? हे समजून घेण्यासाठी…*

*विजय चोरमारे*
संपादक

*सुरेश इंगळे*
प्रकल्प संपादक
(शरद पवार आणि महाराष्ट्र)
९८५०२२०३१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button