मा.रविंद्र धंगेकर म्हणजे आपला माणूस’ “जनसेवक कसब्याचे नवनिर्वाचित आमदार मा.रविंद्र धंगेकर याना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…
वाढदिवस विशेष ...

मा.रविंद्र धंगेकर म्हणजे आपला माणूस’ “जनसेवक कसब्याचे नवनिर्वाचित आमदार मा.रविंद्र धंगेकर याना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…

संपूर्ण राज्याचं लक्ष लागेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का देत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मैदान मारलं आहे.पुणे महापालिकेत तब्बल ५ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रविंद्र धंगेकर यांचा जनसंपर्क कमालीचा आहे. अगदी रात्री १२ वाजताही एखाद्या नागरिकाने मदतीसाठी फोन केला तर धंगेकर यांच्याकडून त्याला प्रतिसाद दिला जातो, अशी त्यांची मतदारसंघात ख्याती आहे. तसंच इतक्या वर्ष नगरसेवक म्हणून काम करूनही चारचाकी गाडीचा वापर न करता ते दुचाकीनेच मतदारसंघात फिरणं पसंत करतात. त्यामुळे नागरिकांचे नेमके काय प्रश्न आहेत, हे जाणून घेत त्याची सोडवणूक करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या धंगेकर यांची लोकांची असलेली नाळ अधिकच घट्ट झाली. अगदी महापालिकेत असलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन करून लोकांनी सांगितेल्या अडचणीही धंगेकर यांच्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या सोडवण्यासाठी ते धाव घ्यायचे.
रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही खरंतर शिवसेनेतून झाली होती. त्यानंतर ते बराच काळ राज ठाकरे यांच्या मनसेत स्थिरावले होते. मनसेमध्ये धंगेकर हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. तिथे त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. इथूनच धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख उंचावत गेला. परंतु नंतर बदललेल्या राजकीय स्थितीत त्यांनी पुन्हा पक्षबदल करत काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं. धंगेकर हे तब्बल पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.रवींद्र धंगेकर म्हणजे आपला माणूस’ अशी ओळख झाली आहे . जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सगळंच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात मिळू लागलं. लोकांच्या या छोट्या-छोट्या गरजा ओळखून रवींद्र धंगेकर यांनी काम सुरू ठेवलं. कोणाला दवाखान्यात मदत असू द्या किंवा इतर कोणतीही अडचण…रवींद्र धंगेकर यांचा फोन २४ तास चालू असतो. कसब्यातील जनतेसाठी अर्ध्या रात्री धावणारा नेता म्हणून धंगेकर यांनी लोकांच्या मनाचा ठाव घेतल्याचं पाहायला मिळतं.
रवींद्र धंगेकर यांचा जन्म नाथाचीवाडी (पिंपळगाव) येथे झाला आहे. १९६५ दरम्यान हेमराज धंगेकर यांना त्यांच्या आत्याने दत्तक घेतले होते. धंगेकर यांचे झाडगे असे मूळ आडनाव आहे.धंगेकर यांची शेती, घर अद्यापही नाथाचीवाडी येथे आहे. हेमराज हे सोने-चांदीचे कारागीर म्हणून ओळखले जात होते. नाथाच्यावाडीतील जिल्हा परिषद शाळेत धंगेकर यांचे प्राथमिक तर माटोबा विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले.
पैलवान असलेले रवींद्र यांनी राजकारणात हार न मानता तिसऱ्यांदा कुस्ती चितपट केली आहे. त्यांच्या विजयासाठी वाडीतील काही ग्रामस्थ कसब्यात तळ ठोकून होते. आपला माणूस आमदार झाला अशीच भावना येथील ग्रामस्थांमध्ये आज पहायला मिळाली.शिक्षण झाल्यानंतर रवींद्र पुण्यात गेले. सामाजिक कार्याची आवड असलेल्या धंगेकर यांनी काही वर्षातच आपला जम बसविला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात चौथ्या वेळेस सुद्धा नगरसेवकपद टिकून आहे.
धंगेकर यांचे कोणीही पुर्वज राजकारणात नसताना भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्यात त्यांनी बाजी मारल्याने त्यांचे कौतुक होत आहे. रवींद्र यांची कर्मभूमी पुणे असली तरी त्यांची गावाशी नाळ जोडलेली आहे. गावातील सुख दुःखात, यात्रेत, सार्वजनिक कार्यक्रमात ते सहभागी असतात.
अशा बहुआयामि व्यक्तीमत्व असामान्य नेतृत्व म्हणजे जनसेवक मा.रविंद्र धंगेकर याना वाढदिवसा च्या अनंत शुभेच्छा.त्याच्या हातून जनहिताचे काम व्हावेत हिच सदिच्छा..

संकलन
धोंडपा नंदे,गावगाथा
