साखरपुड्याला आले आणि लग्न लावून गेले. वागदरी येथील अनोखा विवाह सोहळा.
आदर्शवत विवाह सोहळा.

साखरपुड्यासाठी गेले लग्न करून आले.

समाजासाठी एक आदर्श, उत्तम संदेश

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावचे प्रतिष्ठित व्यक्ती, या समाज समूहाचे सन्माननीय सदस्य श्रीशैल पारप्पा ठोंबरे यांचे सुपुत्र सचिन ठोंबरे यांचे बरोबर टाकळीचे सिद्धाराम शरणप्पा बगले यांची सुकन्या स्वाती बगले यांचे साखरपुडा कार्यकम ठरले होते. आज दि.7 एप्रिल, शुक्रवारी सोलापुरातील निलव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनांमध्ये कार्यक्रम होतं. पाहुणे मंडळी खूप जमले होते. मंडप सजले होते. उत्कृष्ट असे भोजन तयार होते. हे सर्व बघून काही विचारवंत मंडळी ठरवले की या कार्यक्रमातच लग्न केले तर कसे? काहींनी विचारपूस केले एकमेका बरोबर चर्चा केली. काही क्षणातच सगळ्या कडून होकार मिळाले. काही मंडळी लग्नाचे साहित्य आणण्यासाठी गेले. काही तासात ते परतले. पहिल्यांदा साखरपुड्याचे कार्यक्रम झालं. नंतर लग्नकार्याचे तयारी सुरू झाले. लग्न जमले असे ऐकून काही मंडळी उपस्थिती लावली. काही नेतेमंडळी सुद्धा आले. दुपारी सव्वाचार वा.हर्ष उल्लासामध्ये अक्षता कार्यक्रम संपन्न झाला. काही वैचारिक मंडळींनी असे क्रांतिकारी निर्णय घेतल्यामुळे समाजामध्ये एक आदर्श निर्माण झालं. प्रत्येकाने असे क्रांतिकारी पाऊल उचलला पाहिजे. केलेले हे काम खूप कौतुकास्पद आहे असे जाणकार लोकांनी म्हणत होते. बांधवाने असे आदर्श काम करायला पुढे आले पाहिजे. या जोडीला खूप खूप शुभेच्छा.दोन्ही पाहुणे मंडळी कडून सगळे पुरुषांना टॉवेल, टोपी व महिलांना साडी देऊन मान -सन्मान करण्यात आले
