तुर्भे स्टोअर येथे मोफत वैद्यकीय शिबीर व आरोग्य जनजागृती उपक्रमांचे आयोजन.
शिबिरामध्ये सुमारे साडे चारशे नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला

तुर्भे स्टोअर येथे मोफत वैद्यकीय शिबीर व आरोग्य जनजागृती उपक्रमांचे आयोजन.

प्रतिनिधी (नवी मुंबई ) सुभाष हांडे देशमुख:


नवी मुंबई : नूतन वर्ष व मकर संक्रांतीचे औचित्य साधत माहीम – मुंबई येथील सुमन मेडिकल ट्रस्ट व तुर्भे स्टोअर – नवी मुंबई येथील डॉ. रवींद्र गोसावी (सर ) यांच्या सिद्धिविनायक केअर सेंटर तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नवजीवन हिन्दी विद्यालय तुर्भे स्टोअर याठिकाणी रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले. परिसरातील अनेक गरजवंतांनी त्याचा लाभ घेतला.

शिबिराचा शुभारंभ डॉ. सोमनाथ गोसावी मा. प्रशासक महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी व तुर्भे स्टोअर विभागातील मा.नगरसेवक राजू शिंदे यांच्या हस्ते श्री. धन्वंतरीचे पूजन करून करण्यात आले. प्रसंगी बेलापूर विधानसभा मतदारसंघ युवा जिल्हा अध्यक्ष महेश भाई कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व डॉक्टर्स यांचे आभार मानले व खूप स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन केले.

ह्या वर्षी या मोफत शिबिरामध्ये एक आगळा – वेगळा उपक्रम तुर्भे विभागातील नागरिकांसाठी राबविण्यात आला. संपूर्ण बॉडी चेकअप व तुर्भे विभागातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना आरोग्याबद्लची शास्त्रीय माहिती देण्यात आली.
तसेच वयात येणाऱ्या मुलांमुलींना त्यांच्या आहारा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थीनींना मासिक पाळी बद्दल शास्त्रीय माहिती देत मासिक पाळीला प्रॉब्लेम न म्हणता तिला एक मैत्रीण समजावी व त्याबद्दलच्या अंधश्रद्धा, रुढी, परंपरा आपल्याला बदलायच्या आहेत असे डॉ. वंदना कुचिक मॅडम यांनी नमूद केले.
डॉ. समीर पंडय़ा यांनी तुर्भे येथील नागरिकांना हार्ट अॅटॅक कसा ओळखावा व त्याची कोणती लक्षणे असतात ह्याबद्दल मार्गदर्शन केले. निरोगी ह्दय व शरीर सांभाळताना सगळ्या आजाराच मुळ असलेलं तेल, मीठ व साखर ह्यांचे प्रमाण आहारात योग्य ठेवावे असे सांगितले.
डॉ. रविंद्र गोसावी यांनी अति खाणे म्हणजे जास्त प्रमाणात ताकद असे न समजता योग्य प्रमाणशीर समतोल आहार घेणे व त्याचा उर्जेत वापर करणे याचे महत्व विशद करून रोजच्या आहारात असणाऱ्या चपातीतील ग्लुटेन व भात दीर्घकाळानंतर नकळत मधुमेह होण्यास कारणीभूत ठरतो असे सांगत त्याबद्दल मार्गदर्शन केले.
शिबिरातील नागरिकांची डोळ्यांची तपासणी करत डोळ्यांची काळजी ह्यावर मार्गदर्शन केले. गरजू रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. याकरीता डॉ. राजपाल उसनाळे (साई दृष्टी आय हॉस्पिटल सानपाडा टीम)( यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी माहीम सुमन मेडिकल ट्रस्टचे सचिव गोपाळ माणगांवकर, पावणेगाव येथील समाजसेवक डॉ. राम सांगळे, जेष्ठ समाजसेवक वसंत वास्के, चंद्रकांत भोसले, धनश्री बोराडे, संतोष पराड तसेच तुर्भे स्टोअर येथील शाखा प्रमुख लक्ष्मण मेदगे, भिकू पार्टे, टायगर ग्रुप चे अध्यक्ष योगेश कवडे आणि समस्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ह्या शिबिरामध्ये सुमारे साडे चारशे नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. नवजीवन विद्यालय तुर्भे स्टोअर प्राचार्य अजीम सर यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रविंद्र गोसावी यांनी केले.
————————————-