स्वामी कृपेने पुन्हा एकदा लोकसेवेची संधी लाभावी – खा.संजय पाटील
खासदार संजय पाटील यांचे स्वामी समर्थांच्या चरणी साकडे
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240531-WA0066-780x470.jpg)
स्वामी कृपेने पुन्हा एकदा लोकसेवेची संधी लाभावी – खा.संजय पाटील
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
खासदार संजय पाटील यांचे स्वामी समर्थांच्या चरणी साकडे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांचे मनोगत
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
(अक्कलकोट, दि.३१ मे २०२४)
(श्रीशैल गवंडी) – श्री स्वामी समर्थांच्या कृपेनेच आपल्या सामाजिक व राजकीय सेवेची वाटचाल चालू आहे. यंदाही लोकसभा निवडणुक खासदारकीच्या माध्यमातून स्वामी कृपेने आपल्याला पुन्हा एकदा लोकसेवेची संधी लाभावी याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घालून दर्शन घेतले असल्याचे मनोगत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली विश्वस्त महेश गोगी यांनी खासदार संजय पाटील व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला व आगामी निवडणुकीत
खासदार संजय पाटील यांच्या यशाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक भाई बळोरगी, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष बाबा पाटील, नगरसेवक सुनील खवळे, शिवशरण इचगे, राहुल मोरे, मुबारक कोरबू, वसीम बागवान, मुदस्सर शेख, संतोष खवळे,
मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, स्वामीनाथ मुमूडले, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
फोटो ओळ – खासदार संजय पाटील व कुटुंबीयांचा श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश गोगी, श्रीशैल गवंडी व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)