वागदरी येथे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन..
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त महामानवाच्या प्रतिमेचे पूजन रविकिरण वरनाळे व मल्लिनाथ बंदिछोडे पोलीस यांच्या हस्ते करण्यात आले.

वागदरी येथे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन..

वागदरी — वीरशैव कक्कय्या सभागृह येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य,बोधिसत्व,महामानव,शिका,संघटित व्हा संघर्ष करा हे मूल मंत्र देणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त महामानवाच्या प्रतिमेचे पूजन रविकिरण वरनाळे व मल्लिनाथ बंदिछोडे पोलीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना मल्लिनाथ बंदिछोडे म्हणाले
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दलितोद्धारक असे म्हटले जाते. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गुलामीच्या जोखडातून मुक्त केले. त्यामुळे भारतासह परदेशातही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान नेते आणि युगपुरुष होते. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे.
सुधीर सोनकवडे सर यांनी प्रास्ताविक मनोगत म्हणाले बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक होते त्याच बरोबर ते एक नेते, अर्थतज्ज्ञ, आणि उत्कृष्ट कायदेपंडित होते. बाबासाहेब आंबेडकर सदैव दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समाजामध्ये समान न्याय आणि वागणूक मिळवून देण्यासाठी झटत राहिले.महाड मधील चवदार टाळ्याला सत्याग्रह जगप्रसिद्ध आहे. त्यांनी दलितांना मंदिरांमध्ये प्रवेश हि मिळवून दिला.दलितांसाठी लढण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा आर्थिक आणि सामाजिक कणा मजबूत करण्यासाठीही योगदान दिले. अर्थशास्त्र आणि राजनैतिक क्षेत्रातही त्यांनी खूप मोलाचे काम केले. भारतीय संविधानाचे ते शिल्पकार होते.
यावेळी रमेश सावंत,शिवराज मंत्री पोमाजी,शिवानंद बाबा,वाले सर,लक्षिमण हुग्गे,विकास नंजूंडे,गंगाराम सोनकवडे,सुनील सावंत,मल्लिनाथ सोनकवडे,अमोल कटकधोंड लव्हा मंजुळकर,सुरेश सोनकवडे,दिलीप नारायणकर, रोहित सोनकवडे,महादेव सोनकवडे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महादेव सोनकवडे यांनी केले.
