वंचित,बेघर मनोरुग्णांच्या अनवाणी पायाना बळ देणारा सोलापूरचा आवलीया..
सोलापूर चे सामाजिक कार्यकर्ते राज सलगर याची सामाजिक बांधिलकी

वंचित,बेघर मनोरुग्णांच्या अनवाणी पायाना बळ देणारा आवलीया..

माणसाच्या पोळणाऱ्या पायाचे चटके जो पर्यंत तुमच्या काळजाला लागत नाहीत तो पर्यंत तुम्ही त्याच दुख समजू शकत नाही…

राज्यात मागील काही दिवसा पासून उन्हाचा तड़ाखा वाढला आहे सूर्यनारायण अक्षरशः आग ओकतोय कड़क उन्हामुळे दुपारच्यावेळी रस्त्या वरची वरदळ कमी झाली आहे परंतु अनवानी पायानी रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार बेघर लोक व मनोरुग्णाचे काय हाल होत असतील याचा साधा कुणी विचार ही करत नाही नशिबाच्या चटक्या सोबत उन्हाचे चटके सोसणाऱ्याच्या या लोकांच्या मदतीला सोलापुरचा तरुण राज सलगर हा धावून आला आहे गेल्या ३ वर्षापासून तो हा अभिनव उपक्रम राबवत असून आज पर्यंत त्याने हजारों अनवानीना त्याने स्वखर्चातुन शहरातील अनवानी लोकांना चापल्यांचे वाटप केले आहे.

सोलापुरात राहणारे राज सलगर यांना सामाजिक कामात आवड असून कोणी वंचित, बेघर, गरीब आणि मनोरुग्ण अनवाणी पायाने चालत असताना दिसले तर त्यांच्यासाठी मदत करावी म्हणून ठरवले. होलसेल भावात चपलाचे स्टॉक करून ठेवले असून राज सलगर हे आपल्या गाडीच्या डीक्कीत चपलाचे जोडे ठेवत असतात. ३४ वर्षीय राज यांचा कंस्ट्रक्शन चा त्यांचा व्यवसाय आहे या निमित्ताने शासकीय कार्यालय तसेच इतर ठिकाणी त्याला सातत्याने जावे लागते मनोरुग्न आणि निराधाराना रस्त्यावर आणवांनी फिरताना पाहुन त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी त्याला ही चपल्या वाटन्याची कल्पना सूचली कामा निमित्ताने दिवसभर तो त्याच्या स्कुटीवरुण दिवसभर फिरत असतो त्याच्या गाडीच्या डिक्की मध्ये स्त्री पुरुष व लहान मुलांच्या वेगवेगळ्या साइजच्या ९ जोड़ चपला तो नेहमी आपल्या सोबत घेऊन फिरत असतो रसत्यात कुणी मनोरुग्न किंवा बेघर अनवानी दिसला की त्याच्या जवळ जाऊंन विचारपुस करून स्वतःच्या हाताने त्याला चपला घालतो गेल्या ३ वर्षापासून तो हा उपक्रम राबवतो साधारण दरवर्षी 800 ते 1000 जनांना त्यांचा लाभ होतो.

अनेक जन त्याच्या उपक्रमाचे कौतुक करतात या उपक्रमा साठी त्याला देनगी देण्याची इच्छा व्यक्त करतात परन्तु तो ही विनंती नम्र पने नाकारतो तो त्याना म्हणतो की त्यानी ही पुढाकार घेऊन पुढे येऊन स्वतः लोकांच्या मदतीला सरसावले पाहिजे ऐसे त्याचे मत आहे. या शहरात कुणीच अन्वानी फिरला नाही पाहिजे हा आयुष्य भराचा संकल्प आहे यांचा आजू बाजूला असणाऱ्या रंजल्या गांजल्या लोकांच्या वेदना आपण समजून घेऊन आपल्या परीने तो कमी करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे हाच खरा मानवधर्म आहे.

अश्या या सोलापुरच्या अवलियाला सलाम ✌️
आपल्या कडे ही अशी महत्वपूर्ण माहिती असेल तर आम्हाला नक्की पाठवा…
गावगाथा 9850619724