स्वामी पुण्यतिथी महोत्सवाची गोपाळ काल्याने सांगता.
गोपाळ काल्याप्रसंगी दही हंडी फोडताना मंदार पुजारी महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230419-WA0064-780x470.jpg)
स्वामी पुण्यतिथी महोत्सवाची गोपाळ काल्याने सांगता.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(दि.१९/४/२३) श्रीशैल गवंडी –
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात आज सायंकाळी ७ वाजता गोपाळकाल्याने झाली.
सायंकाळी ६:३० वाजता उपजोनिया पुढती येऊ ! काला खाऊ दहीभात !! वैकुंठी तो ऐसे नाही ! कवळ काही काल्याचे !! एकमेका मुखी घालू ! सुखी देऊ हंबरी !! तुका म्हणे अवघे ! बरवे वाळवंट उत्तम !! या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने व देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज व मोहन महाराज यांच्या हस्ते पूजा करून व देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांचे उपस्थितीत दहीहंडी काला फोडून गोपाळकाला गोड झाला ! गोविंदाने गोड केला !! या नामघोषात गोपाळ काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांचे भजन, अभंग, गवळण व भारूड सेवा आदींचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमात सुुरेखा तेली, अर्चना पाठक, सुमती शिर्के, सागर पवार, सोलापूूरच्या सुनंदा गोखले, कस्तुरा चौगुले, शीला पाटील, मिनाक्षी शिंदे, उषा राऊत यांनी समाजातील विविध विषयांवर प्रबोधनात्मक विषय मांडून नाटकीय धार्मिक
आधी विविध विषयांवर अनेक सोंगी रुपे घेवून विविधभारूड सादर केले. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाल्याची माहिती देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. या प्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, संपतराव शिंदे, प्रदीप झपके, विजयकुमार दास, भीमराव भोसेकर, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब घाटगे, प्रदिप हिंडोळे, नलिनी ग्रामोपाध्ये, कौसल्या जाजू, निर्मला हिंडोळे, निंगू हिंडोळे, सुरेखा तेली, इंदूमती जंगाले, शकुंतला साळूंके, नीता ग्रामोपाध्ये, सुनंदा राजोपाध्ये, रेखा सुरवसे, बेबी शिंदे, लक्ष्मी पाटील, सुमती शिर्के, कमल सुलाखे प्रदीप हिंडोळे, रामचंद्र समाणे, शिवशरण अचलेर, दीपक जरीपटके, बंडू घाटगे, चंद्रकांत डांगे, श्रीपाद सरदेशमुख, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, मोहन शिंदे, प्रसाद सोनार, संजय पाठक, अविनाश क्षीरसागर, महेश मस्कले, सचिन हन्नुरे, ऋषिकेश लोणारी, नागनाथ गुंजले, संतोष जमगे, प्रसन्न हत्ते, अक्षय सरदेशमुख, लखन गवळी, सिध्दार्थ थंब, गणेश इंगळे, आकाश चुंगीकर, विपूल जाधव, सचिन पेठकर, समर्थ गडकरी, अरविंद कोकाटे, मनोहर देगांवकर, समर्थ घाटगे, दिपक गवळी, आदींसह देवस्थानचे कर्मचारी सेवेकरी व असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
फोटो ओळ – गोपाळ काल्याप्रसंगी दही हंडी फोडताना मंदार पुजारी महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)