ठळक बातम्या

Umarga : तब्बल ४१ वर्षांनंतर मैत्रीचं मनोमिलन ; मुरूमच्या ज्ञानदान विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

 उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) : मुरूम येथील ज्ञानदान शिक्षण प्रसारक संस्था संचलित ज्ञानदान विद्यालयाच्या १९८३-८४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षानंतर एकत्र येऊन आयोजित स्नेहमेळावा रविवारी ( ता. २६) रोजी श्रीराम मंगल कार्यालयात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एन. आय. करपे होते. प्रमुख अतिथी ज्ञानदान संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर मुदकन्ना होते. यावेळी संचालक सिद्राम हुळमुजगे, काशिनाथ मुदकन्ना, रवी बदोले आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कालखंडात मृत्यु पावलेले गुरुवर्य व वर्गमित्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी गुरुवर्य एन. आय. करपे, एन. बी. हावळे, एस. बी. माने, ए. के. शेख, एम. पी. लूल्ले, ए. बी. कुलकर्णी, कार्यालयीन कर्मचारी अमीन कांबळे, शंताप्पा कामशेट्टी आदींचा माजी विद्यार्थ्यांकडून यथोचित सत्कार करण्यात आला. दिलीप मुदकण्णा, धनराज शिंदे, सुभाष गवई, संजीव शिंदे, मारुती मडोळे, राजू शिंदे, शंकर मोरे, मधुकर वाकळे, फुलचंद भालेराव, शाहूराज जगताप, दिपक भाट, इसाक पटेल, वैजीनाथ पांढरे, बसवराज मुदकण्णा आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगशिक्षक नागनाथ बदोले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता इंगळे तर आभार शकील शेख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button