Akkalkot: कल्याणशेट्टी विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.७१ टक्के
अक्कलकोट: सौ.सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालयाचा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेस एकूण 78 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. पैकी 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर संपूर्ण शाळेचा निकाल 98.71% इतका लागला आहे.

यात 90% पेक्षा जास्त 6 विद्यार्थी असून 75 % पेक्षा जास्त 37 विद्यार्थी आहेत.

कु. प्रतिक्षा सोलनकर ही 92.80% गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली आहे.

कु.स्फूर्ती खराडे ही 92.60% गुण मिळवून द्वितीय आली, तर

कु.लक्ष्मी चिकमळी ही 91.60% मिळवून प्रशालेत तिसरी आली आहे. यावर्षीही गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यानी अभिनंदन केले आहे.
निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक सर्व शिक्षकांचे संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.
