दिन विशेष

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पुरस्कार वितरण..

यांच्या हस्ते नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने,जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

HTML img Tag Simply Easy Learning    

नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने,

HTML img Tag Simply Easy Learning    

जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी

HTML img Tag Simply Easy Learning    

यांच्या हस्ते राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पुरस्कार वितरण
मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन
दि २६ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ५.३० वाजता दासावा, धुरू हॉल, पहिला मजला, छबिलदास लेन, दादर-पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी, मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त श्री प्रमोदभाई शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मा श्री मंगेश चिवटे, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव हे उपस्थित राहाणार आहेत असे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी सांगितले आहे.
यावेळी संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राजस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. त्याचबरोब वाचन चळवळीतील योगदानाबद्दल प्रदीप कर्णिक यांना दत्ता कामथे स्मृती पुरस्कार, मराठी भाषेत शिवकालीन इतिहासाचा आयुष्यभर धांडोळा घेत इतिहास प्रेमींचे ग्रंथदालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आप्पा परब यांना सेवाव्रती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती ‘मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धा, शाखाप्रमुख संजय भगत (प्रभादेवी) पुरस्कृत (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा या विषयावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री तर कवयत्री अनघा तांबोळी यांचा तरल काव्यानुभव ‘केवल प्रयोगी’ चे सादरीकरण सादर करणार आहेत. या कार्यक्रमास स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनी, मराठी भाषाप्रेमी, अभ्यासक, वाचक यांनी उपस्थित राहावे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button