गावगाथा

जिल्हा परिषदेतील बसवण्णांची प्रतिमा प्रेरणा देईल : दिलीप स्वामी

वीरशैव व्हिजनतर्फे जिल्हा परिषदेस महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा भेट

जिल्हा परिषदेतील बसवण्णांची प्रतिमा प्रेरणा देईल : दिलीप स्वामी

वीरशैव व्हिजनतर्फे जिल्हा परिषदेस महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा भेट

सोलापूर : बाराव्या शतकात समाजाला समतेचा संदेश देणारे ते खऱ्या अर्थाने समतानायक होते. समाजसुधारणांची बीजे रोवणारे ते पहिले समाजसुधारक होते. त्यांनी अनेक तलाव खोदले, अन्नदासोह सुरु केले, गरिबांसाठी दवाखाने असे अनेक समाजोपयोगी कार्य केले. जिल्हा परिषदेतील बसवण्णांची प्रतिमा लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामे करण्यास प्रेरणा देईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
वीरशैव व्हिजनतर्फे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात लावण्यासाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा देण्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे, रवींद्र चिंचोळकर, बसव व्याख्याते महेश कोटीवाले उपस्थित होते.
यावेळी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या हस्ते व सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, अमित कलशेट्टी, युवक आघाडी अध्यक्ष विजयकुमार हेले, सचिन विभुते जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी मराठा सेवा संघटना अध्यक्ष अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन जाधव, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी सिद्धाराम बोरुटे, डॉ. बसवराज बगले, राजकुमार सारणे, लक्ष्मीकांत पुजारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गुरव यांनी केले. कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी आभार मानले.

फोटो ओळी : वीरशैव व्हिजनतर्फे जिल्हा परिषदेस महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा भेट देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अरविंद जोशी, ईशादीन शेळकंदे, राजशेखर बुरकुले, विजयकुमार बिराजदार, अमित कलशेट्टी, विजयकुमार हेले, सचिन विभुते, अमित कलशेट्टी, अविनाश गोडसे, डॉ. बसवराज बगले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button