अन्नछत्र सेवाकार्य देशभरात पोहोचले असून, अन्नछत्रामुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोटचे प्रगती होत असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी अभिनेत्री किशोरी आंबिये
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे सुरू असलेल्या अन्नछत्र सेवाकार्य देशभरात पोहोचले असून, अन्नछत्रामुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोटचे प्रगती होत असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी अभिनेत्री किशोरी आंबिये यांनी व्यक्त केल्या.

त्या तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, अभियंता अमित थोरात, बाळासाहेब घाडगे, निखिल पाटील, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
