दिन विशेष

ग्रंथालय अधिकारी कार्यालय व सोनी वाचनालय आयोजित ग्रंथ प्रदर्शन संपन्न

ग्रंथांच्या सान्निध्यात जीवन सम्रुध्द बनते." संतोष जाधव

ग्रंथालय अधिकारी कार्यालय व सोनी वाचनालय आयोजित ग्रंथ प्रदर्शन संपन्न
———————————————
“ग्रंथांच्या सान्निध्यात जीवन सम्रुध्द बनते.”
संतोष जाधव
———————————————
सोलापूर दि.२३ एखादा कर्त्रुत्ववान माणूस सा-या विश्वाचे जीवनमान उंचावू शकतो अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. आजचा जागतिक ग्रंथ दिवस म्हणजे ख्यातनाम नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस जागतिक ग्रंथदिवस म्हणून साजरा होत आहे .शेक्सपिअर यांची नाटके म्हणजे जीवनासाठी संजीवनी करली होती. असे स्पष्ट करुन संतोष जाधव पुढे म्हणाले की, शासनाच्या वतीने वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अनेक योजना आहेत त्यांचा उपयोग करून वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्देश्वर उकळे यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करतांना प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार म्हणाले की,पुस्तके आणि चांगली माणसे लवकर कळत नाहीत. त्यांना वाचावीच लागतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पुस्तके आणि चांगली माणसे कालौघात नष्ट होण्याआधी वाचून ते तत्वज्ञान समाजासमोर आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करुन डॉ. बिराजदार पुढे म्हणाले की, सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून ख-या अर्थाने परिवर्तन करता येते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरसिंह मिसालोलू यांनी केले तर आभार प्रदर्शन महारुद्र कत्ते यांनी केले. कार्यक्रमास धोंडीराम जेऊरकर,कर्मचारी संघटनेचे पुणे विभागाचे नेते सदाशिव बेडगे,तात्यासाहेब भोसले, सिध्दाराम हलकुडे,जगदीश गीडवीर,विजय पाटील, रमेश फुले, तिप्पण्णा गणेरी,अरिहंत रत्नपारखे,श्रीमती यल्ला व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button