स्वामी कृपेची सावली कुटूंबीयांच्या पाठीशी राहण्याकरिता स्वामीं चरणी साकडे – आ.शेखर निकम
आ.शेखर निकम व कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, दिलीप भाऊ सिध्दे व इतर दिसत आहेत.

स्वामी कृपेची सावली कुटूंबीयांच्या पाठीशी राहण्याकरिता स्वामीं चरणी साकडे – आ.शेखर निकम

येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांचे आपण व माझे कुटुंबीय हे निस्सिम भक्त आहोत. स्वामी कृपेची सावली आमच्या पाठीशी आहेच, परंतु यापुढेही त्यांची कृपा आमच्या कुटुंबीयांवर राहावी व त्यांच्या आशीर्वादाने भक्तीमय जीवन व्यतीत व्हावे व स्वामी कृपेने स्वामी कृपेची सावली यापुढेही आमच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहावे याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे मनोगत चिपळूण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आ.निकम बोलत होते. याप्रसंगी अक्कलकोट राष्ट्रवादीचे दिलीप भाऊ सिद्धे, प्रशांत बाबर, रुद्धय्या स्वामी, बंटी पाटील,
मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, विपुल जाधव, आदींसह निकम परिवार व स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ -आ.शेखर निकम व कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, दिलीप भाऊ सिध्दे व इतर दिसत आहेत.
