“हा प्रसंग कधी तरी येणारच होता,” शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचे केवळ अजित पवारांनी केले समर्थन
लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली

“हा प्रसंग कधी तरी येणारच होता,” शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचे केवळ अजित पवारांनी केले समर्थन*
‐—–
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयाचे केले समर्थन केले आहे. अजित पवार म्हणाले की, “पवार साहेब निर्णय मागे घेणार नाही. नवीन अध्यक्ष पवारांच्या निर्णयाखाली काम करेल. पवार कुटुंबप्रमुखच राहणार आहेत. भावनिक होण्याचं कारण नाही. हा प्रसंग कधी न कधी येणारच होता.’ यावेळी निर्णय मागे घ्या असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील अजित पवारांनी सुनावले. मात्र तरीही कार्यकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. तसेच अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना न बोलण्याचा सल्लाही दिला.

पुढे अजित पवार म्हणाले, “समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल. कमिटी म्हणजे मोठी लोकं नाहीत. परिवारातील सदस्य असतील. पवार साहेबांच्या त्यांच्या मनात जे आहे तेच आपण करू. तुम्ही कुठेही बोलावलं तरी मार्गदर्शन ते करतील. नव्या अध्यक्षाच्या मागे आपण उभा राहू. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता. साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करून नव्या नेतृत्वाकडे जबाबदारी देण्यात येणार आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष नेतृत्व काम करेल.”

शरद पवार काय म्हणाले ?

निवृत्तीबाबत शरद पवार म्हणाले की, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेईल.” शरद पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावुक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
