सामाजिक बांधिलकी

दानधर्म हा हाताचा अलंकार आहे : श्री शिवपुत्र स्वामीजी

कामगारदिनी 400 महिला कामगारांना 'साड्यांचा आहेर' समाजसेवक दत्ता सुरवसे यांचे दातृत्व

दानधर्म हा हाताचा अलंकार आहे : श्री शिवपुत्र स्वामीजी

HTML img Tag Simply Easy Learning    

कामगारदिनी 400 महिला कामगारांना ‘साड्यांचा आहेर’ समाजसेवक दत्ता सुरवसे यांचे दातृत्व

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर : ‘स्तस्य भूषणम दानम’ असा संस्कृतमध्ये श्लोक आहे. आपण हातामध्ये अंगठ्या, कडे, बांगडया, पाटल्या, बिल्वर, ब्रेसलेट घालत असतो. वास्तविक ते आपल्या हाताचे अलंकार नसून त्याच हाताने दानधर्म करणे हा खरा अलंकार आहे. गरीब महिलांना साडया वाटप करून समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे यांच्या हातामध्ये तो अलंकार शोभून दिसत आहे असे प्रतिपादन श्री बसवारूढ मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र स्वामीजी यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे यांच्या दातृत्वातून, वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांना साड्यांचा आहेर देण्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर श्री किरिटेश्वर मठाचे मठाधिपती श्री स्वामीनाथ स्वामीजी, उद्योजिका वैशाली सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक अनुजा पाटील, महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पुष्पावती गुंगे, शंकरलिंग महिला मंडळाचे अध्यक्षा राजश्री थळंगे, आस्था रोटी बँकेचे उपाध्यक्ष आनंद तालिकोटी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या सचिवा माधुरी बिराजदार उपस्थित होते.
यावेळी समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे यांच्यातर्फे विडी कामगार, घरेलू कामगार, टेक्सटाईल कामगार अशा गरीब 400 कामगार महिलांना साड्यांचा आहेर देण्यात आला.
श्री शिवपुत्र स्वामीजी पुढे म्हणाले की, ‘सत्य कंठस्य भूषणम’ म्हणजे सत्य बोलणे हे आपल्या कंठाला भूषणावह आहे. गळ्यात विविध दागिने घालणे भूषणावह नाही. ‘श्रोतस्य भूषणम शास्त्रम’ म्हणजे आपल्या कानाने आपण शास्त्र म्हणजे चांगले विचार ऐकले तरच कानाला शोभा आहे.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रा. डॉ. शुभदा शिवपुजे यांनी केले. प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुंधती शेटे यांनी केले तर आभार माधुरी बिराजदार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेशमा निडगुंदी, दीपा तोटद, रेणुका सर्जे, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, शिवानंद सावळगी, संजय साखरे, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, महेश विभुते, मेघराज स्वामी, अमित कलशेट्टी, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, चेतन लिगाडे, सचिन विभुते, संगमेश कंठी, सिद्धेश्वर बेवूर, सुहास छंचुरे, सागर याळवार यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळी : समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे यांच्या दातृत्वातून, वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून साड्या वाटपप्रसंगी श्री शिवपुत्र स्वामीजी, श्री स्वामीनाथ स्वामीजी, उद्योजिका वैशाली सुरवसे, अनुजा पाटील, पुष्पावती गुंगे, राजश्री थळंगे, माधुरी बिराजदार, आनंद तालिकोटी, राजशेखर बुरकुले, अरुंधती शेटे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button